संसदीय कामकाज मंत्रालय
येत्या 10 व्या योगदिनाचे औचित्य साधून संसदीय कामकाज मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत योग कार्यशाळा आयोजित
Posted On:
12 JUN 2024 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2024
संसदीय कामकाज मंत्रालयानं नवी दिल्लीतील संसद भवन ग्रंथालय इमारतीत योगगुरू डॉ सुरक्षित गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली परवा, 10 जून रोजी योग कार्यशाळा आयोजित केली होती. संसदीय कामकाज मंत्रालयाचे सचिव उमंग नरूला यांनी या कार्यशाळेचे उद्घाटन केले.संसदीय कामकाज मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ सत्य प्रकाश यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व यावेळी विशद केले. तर आपल्या दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व डॉ. सुरक्षित गोस्वामी यांनी सांगितले. व्यावसायिक आणि वैयक्तिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी काही प्रभावी योगासने आणि प्राणायाम करण्यासाठी गोस्वामी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नियमितपणे योगाभ्यास आणि प्राणायाम करण्याचे अनेक फायदे असल्याचं ते म्हणाले.
या कार्यशाळेत नरुला, डॉ. सत्य प्रकाश यांच्यासह मंत्रालयातील इतर अधिकारी –कर्मचारीही उत्साहाने सहभागी झाले होते.
N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2024692)
Visitor Counter : 72