आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
प्रतापराव गणपतराव जाधव यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला
Posted On:
11 JUN 2024 6:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2024
प्रतापराव जाधव यांनी आज आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्याकडे आयुष मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा (स्वतंत्र कार्यभार) देखील कार्यभार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयात कार्यभार स्वीकारण्यापूर्वी,प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या निवासस्थानी एक रोपटे लावले. कार्यभार स्वीकारल्यानंतर, त्यांनी अवयवदानाची प्रतिज्ञा देखील घेतली.
प्रतापराव जाधव यांनी महाराष्ट्रातील जनतेचे विविध पदांवर प्रतिनिधित्व केले आहे, ज्यात महाराष्ट्र विधानसभेत तीन वेळा आमदार आणि क्रीडा, युवक कल्याण, आणि सिंचन विभागाचे राज्य मंत्री याचा समावेश आहे. त्यांची 2009,2014,2019 आणि पुन्हा 2024 साली बुलढाणा मतदारसंघातून लोकसभेवर निवड झाली. 1997 ते 1999 दरम्यान ते महाराष्ट्र शासनाचे क्रीडा, युवक कल्याण आणि सिंचन विभागाचे राज्य मंत्री होते. लोकसभेवर निवडून आल्यानंतर त्यांनी ग्रामीण विकास आणि पंचायती राज स्थायी समितीचे अध्यक्ष पद आणि संचार आणि माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीचे अध्यक्ष पद यासारख्या महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे.
त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्यासह त्यांनी आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा आणि अतिरिक्त सचिव (आरोग्य) रोली सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत केले.
S.Kane/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2024297)
Visitor Counter : 130