अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
चिराग पासवान यांनी स्वीकारला केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा कार्यभार
प्रविष्टि तिथि:
11 JUN 2024 4:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2024
चिराग पासवान यांनी आज नवी दिल्ली येथे पंचशील भवनात अन्न प्रक्रिया खात्याच्या केंद्रीय मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला.

यावेळी सचिव अनिता प्रवीण यांनी इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांचे स्वागत केले. कार्यभार स्वीकारल्यानंतर चिराग पासवान यांनी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि योजनांचा आढावा घेतला. अन्न प्रकिया मंत्रालयाची जबाबदारी सोपवल्याबद्दल मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. या मंत्रालयाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे त्यांनी यावेळी सांगितले.चिराग पासवान हे बिहारमधील हाजीपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.


S.Kane/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2024117)
आगंतुक पटल : 156