माहिती आणि प्रसारण मंत्रालय
डॉ.लोगनाथन मुरुगन यांनी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला
प्रविष्टि तिथि:
11 JUN 2024 2:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2024
डॉ. एल. मुरुगन यांनी आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. मुरुगन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानले. शासकीय धोरणांच्या अंमलबजावणीत केंद्र सरकार आणि देशातील नागरिक यांच्यात संवाद साधणारा दुवा म्हणून माहिती आणि प्रसारण मंत्रालय महत्वाची भूमिका पार पाडते, असे ते म्हणाले.
केंद्र सरकार गरिबांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे आणि प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 3 कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयावरून हे दिसून येते आहे, असे त्यांनी सांगितले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी आणि मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले माध्यम युनिट्स यांनी मुरुगन यांचे स्वागत केले.

S.Tupe/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2024020)
आगंतुक पटल : 118
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Khasi
,
Urdu
,
Nepali
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam