पंतप्रधान कार्यालय
रामोजी राव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले.
प्रविष्टि तिथि:
08 JUN 2024 11:33AM by PIB Mumbai
रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये क्रांती घडवून आणणारे रामोजी राव हे दूरदर्शी होते, असे मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या अतिशय भरीव योगदानामुळे पत्रकारिता आणि चित्रपट विश्वावर अमिट ठसा उमटवला आहे. त्यांनी आपल्या उल्लेखनीय कार्याद्वारे प्रसारमाध्यम आणि मनोरंजन विश्वात नवोन्मेष आणि उत्कृष्टता यांचे नवे मापदंड प्रस्थापित केले.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः
रामोजी राव गारू यांना भारताच्या विकासाचा मोठा ध्यास होता. त्यांच्यासोबत संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या विद्वत्तेचा लाभ घेण्याच्या अनेक संधी मला लाभल्या याबद्दल मी स्वतःला भाग्यवान मानतो. या कठीण प्रसंगात त्यांचे कुटुंब, मित्रपरिवार आणि असंख्य चाहते यांच्यासोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. ओम शांती.”
***
S.Tupe/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2023574)
आगंतुक पटल : 137
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Malayalam