पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांना ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी दूरध्वनीवरून दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान अल्बेनीज यांच्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले
सामायिक प्राधान्यक्रमांच्या बाबींवर एकत्र येऊन काम करण्याच्या कटिबद्धतेचा दोन्ही नेत्यांनी केला पुनरुच्चार
प्रविष्टि तिथि:
06 JUN 2024 3:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जून 2024
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बेनीज यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यांच्याशी दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या . त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे आभार मानले.
या संभाषणादरम्यान मोदी यांनी त्यांच्या 2023 मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तसेच गेल्या सप्टेंबर महिन्यात दिल्ली येथे जी-20 परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान अल्बेनीज यांच्यासोबत झालेल्या बैठकीची आठवण काढली.
व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी तसेच हिंद-प्रशांत क्षेत्रात सामायिक प्राधान्यक्रमाच्या घटकांबाबत एकमेकांबरोबर काम करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत एकत्र येऊन प्रयत्न करण्याच्या वचनबद्धतेचा पंतप्रधान मोदी यांनी पुनरुच्चार केला.
* * *
S.Kane/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2023147)
आगंतुक पटल : 88
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Khasi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam