भारतीय निवडणूक आयोग

सार्वत्रिक निवडणुका  2024- मतमोजणीचे कल आणि निकालांची माहिती

Posted On: 01 JUN 2024 7:44PM by PIB Mumbai

 

लोकसभा निवडणूक - 2024 तसेच आंध्र प्रदेश आणि ओदिशा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी 4 जून 2024 (मंगळवार) सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश विधानसभेसाठीच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी उद्या 2 जून 2024 ला (रविवार) सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होईल. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू यांनी सर्व मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत आज देशभरातील मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतला.

निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रत्येक विधानसभा तसेच  लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीसंदर्भातील माहिती दिल्यानंतर, मतमोजणीचे कल आणि निकालाविषयीची माहिती केंद्रीय  निवडणूक आयोगाच्या https://results.eci.gov.in  या संकेतस्थळावर तसेच Voter Helpline या मोबाईल अॅपवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. Voter Helpline हे मोबाईल अॅप आयओएस आणि अँड्रॉइड अशा दोन्ही मोबाईल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. अँड्रॉइड मोबाईलधारकांना गुगल प्ले स्टोअरवरून, तर  आयओएस मोबाईलधारकांना अॅपल प्ले स्टोअरवरून Voter Helpline हे मोबाईल अॅप डाऊनलोड करता येईल. वापरकर्त्यांना Voter Helpline या मोबाईल अॅपवर मतदारसंघनिहाय तसेच राज्यनिहाय निकाल पाहता येतील. यासोबतच विजयी झालेल्या तसेच आघाडीच्या किंवा पिछाडीवर असलेल्या उमेदवाराचा तपशील शोधण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या फिल्टरचा वापरही करता येणार आहे. पुढे दिलेल्या दुव्यावरून Voter Helpline हे मोबाईल अॅप डाऊनलोड करता येईल :

Android : https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen&hl=en_US

iOS : https://apps.apple.com/in/app/voter -helpline/id1456535004

Handbook for Returning Officers and Counting agents available on ECI website can be accessed here: https://tinyurl.com/yknwsu7r  & https://tinyurl.com/mr3cjwhe  respectively.

निवडणूक निर्णय अधिकारी आणि मतमोजणी प्रतिनिधींसाठीची मार्गदर्शक पुस्तिका  निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही पुस्तिका पुढे  दिलेल्या दुव्यावर पाहता येईल :

https://tinyurl.com/yknwsu7r

आणि

https://tinyurl.com/mr3cjwhe.

मतमोजणी व्यवस्था, मतमोजणीची प्रक्रिया आणि ईव्हीएम/व्हीव्हीपीएटी साठवण्याबाबत आयोगाच्या सर्वसमावेशक सूचना ECI वेबसाइटवर आधीच उपलब्ध आहेत ज्या येथे पाहता येतील:

Counting Arrangements: https://tinyurl.com/yxvm5ueh

Counting Process: https://tinyurl.com/2sdsjkc9

Storage of EVMs/VVPATs: https://tinyurl.com/5hcnzrkc

***

S.Kane/T.Pawar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2022488) Visitor Counter : 96