ऊर्जा मंत्रालय
आऊटलुक प्लॅनेट सस्टेनेबिलिटी शिखर परिषद आणि पुरस्कार 2024 मध्ये आरईसी ने पटकावला “सस्टेनेबिलिटी चॅम्पियन - एडिटर्स चॉईस पुरस्कार"
Posted On:
29 MAY 2024 1:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 मे 2024
ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या महारत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि आघाडीची बिगर-बॅंकिंग वित्तीय कंपनी असलेल्या आरईसी लिमिटेडला ‘आऊटलुक प्लॅनेट सस्टेनेबिलिटी शिखर परिषद आणि पुरस्कार 2024 मध्ये ‘सस्टेनेबिलिटी चॅम्पियन - एडिटर चॉईस पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले आहे. आउटलुक समूहाने गोव्यातील आयआयटी यांच्या सहकार्याने हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता.
हा पुरस्कार आरईसी ची शाश्वतता उपक्रमांप्रति वचनबद्धता आणि हरित भविष्याकडे प्रगती करण्याचे प्रयत्न तसेच कंपनीच्या हरित भविष्याकडे वाटचाल करणारे शाश्वत उपक्रम राबवण्यासाठी केलेला संकल्प अधोरेखित करतो.
आरईसीच्या मुंबई कार्यालयातील वरिष्ठ महाव्यवस्थापक सरस्वती यांनी गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार स्वीकारला.
आरईसी कंपनी भारताच्या ऊर्जा संक्रमणाला उत्प्रेरित करण्यात आघाडीवर आहे. या कंपनीच्या योजना स्वच्छ उर्जा स्त्रोतांच्या वापराकडे जागतिक स्तरावर दिल्या जात असलेल्या प्राधान्यक्रमाशी संरेखित आहेत. याशिवाय ही कंपनी भारताच्या ऊर्जा संक्रमणाचा अग्रगण्य वित्तपुरवठादार होण्यासाठी वचनबद्ध आहे.
आउटलुक प्लॅनेट शाश्वतता शिखर परिषद आणि पुरस्कार हे असे एक प्रमुख व्यासपीठ आहे जे उद्योगातील धुरिणांना, धोरणकर्त्यांना आणि शाश्वततेचा पुरस्कार करणाऱ्यांना आणि शाश्वत पद्धतींमध्ये उत्कृष्टतेला चालना आणि या पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र आणते. या वर्षीच्या शिखर परिषदेत अर्थपूर्ण चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले, तसेच नवोन्मेषी कल्पना आणि शाश्वततेसाठी समर्पित संस्थांच्या उल्लेखनीय कामगिरीची ओळख करून देण्यात आली.
* * *
S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2022044)
Visitor Counter : 110