दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

एसएमएस घोटाळेबाजांवर दूरसंचार विभाग आणि गृहमंत्रालयाची कारवाई

Posted On: 27 MAY 2024 6:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 मे 2024

 

बनावट एसएमएसद्वारे संभाव्य फसवणूकीपासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी दूरसंचार विभागाने केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहकार्याने संचार साथी उपक्रमाच्या माध्यमातून निर्णायक कारवाई केली आहे.

सायबर गुन्हे करण्यासाठी बनावट संदेश पाठवणाऱ्या आठ एसएमएस हेडर्स माहिती गृहमंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने(I4C), उपलब्ध करून दिली आहे.

दूरसंचार विभागाने केलेली कारवाईः

  1. या ठिकाणी ही बाब विचारात घेण्यात आली की गेल्या तीन महिन्यात या आठ हेडर्सचा वापर करून 10,000 पेक्षा जास्त बनावट संदेश पाठवण्यात आले.
  2. या आठ एसएमएस हेडर्सची मालकी असणाऱ्या प्रमुख संस्थांचा समावेश काळ्या यादीत करण्यात आला आहे.
  3. या प्रमुख संस्थाच्या मालकीच्या असलेल्या सर्व 73 एसएमएस हेडर्स आणि 1522 एसएमएस आशय पट्टिकांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.
  4. या प्रमुख संस्था, एसएमएस हेडर्स किंवा पट्टिका यांच्यापैकी कोणाचाही आता एखाद्या दूरसंचार ऑपरेटरला एसएमएस पाठवण्यासाठी वापर करता येणार नाही.

दूरसंचार विभागाने या संस्थांना काळ्या यादीत टाकून नागरिकांची आणखी संभाव्य फसवणूक टाळली आहे. सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्याच्या वचनबद्धतेचा दूरसंचार विभागाने पुनरुच्चार केला आहे.

सायबर गुन्ह्यांसाठी आणि आर्थिक घोटाळ्यांसाठी दूरसंचार संसाधनांच्या गैरवापराला प्रतिबंध करण्यात दूरसंचार विभागाला मदत करण्यासाठी नागरिकांनी संशयित घोटाळेबाजांकडून होणाऱ्या संभाषणाची तक्रार संचार साथीवरील चक्षू सुविधेवर दाखल करावी.

टेलिमार्केटिंग एसएमएस/कॉल्सविषयी

  1. टेलिमार्केटिंगसाठी मोबाईल क्रमांकांना प्रतिबंधः टेलिमार्केटिंग व्यवहार करण्यासाठी मोबाईल क्रमांकांचा वापर करण्याची अनुमती नाही. जर  एखादा ग्राहक त्याच्या टेलिफोन कनेक्शनचा वापर प्रमोशनल संदेश पाठवण्यासाठी करत असेल तर पहिल्या तक्रारीच्या आधारे त्याचे कनेक्शन खंडीत करण्यात येईल आणि त्याचे नाव आणि पत्ता यांचा समावेश दोन वर्षांकरिता काळ्या यादीत करण्यात येईल.  
  2. टेलिमार्केटिंग कॉल्स ओळखणेःटेलिमार्केटिंग कॉल्स त्यांच्या सुरुवातीच्या क्रमांकावरून ओळखता येतातः 180,140 आणि 10 आकडी क्रमांकांना टेलिमार्केटिंग करण्याची अनुमती नाही.
  3. स्पॅमची तक्रार करणेः स्पॅमची तक्रार करण्यासाठी 1909 क्रमांक डायल करा किंवा डीएनडी(डू नॉट डिस्टर्ब) सेवा वापरा.

 

* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2021853) Visitor Counter : 73