उपराष्ट्रपती कार्यालय

देशात फिटनेस संस्कृती विकसित करण्याच्या गरजेवर उपराष्ट्रपतींनी दिला भर


खाजगी क्षेत्रातल्या धुरिणांनी सामाजिक दायित्वाद्वारे संशोधन आणि विकासाला चालना द्यावी- उपराष्ट्रपतींचे आवाहन

शिकणे ही एक आजीवन चालणारी प्रक्रिया आहे; नेहमी शिकत राहा - उपराष्ट्रपती

Posted On: 27 MAY 2024 5:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 मे 2024

 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज देशात फिटनेस संस्कृती विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला जेणेकरून प्रत्येक भारतीय तंदुरुस्त आणि निरोगी असेल आणि 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या वाटचालीत सकारात्मक योगदान देऊ शकेल.

आज कर्नाटकमधील बेळगावी इथे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) - राष्ट्रीय पारंपरिक चिकित्सा संस्थेच्या (NITM) 18 व्या स्थापना दिन समारंभाला संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी  भावी पिढ्यांसाठी आपली जैवविविधता आणि पारंपरिक ज्ञानाचे संरक्षण करण्याच्या गरजेवर  भर दिला.

देशाला आरोग्याची काळजी घेण्याबाबत आणि आरोग्याबाबत जागरूक बनवण्यासाठी प्रत्येक गावाला या उदात्त कार्यात सहभागी करून घेण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले. ”पंचायत स्तरावरही  आपण औषधे आणि वनौषधी वनस्पतींवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे”, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले. 

उपराष्ट्रपतींनी केएलई उच्च शिक्षण आणि संशोधन अकादमीच्या 14 व्या दीक्षांत समारंभालाही संबोधित केले. 

एनआयटीएम मधील कार्यक्रमानंतर, उपराष्ट्रपतींनी बेळगावी येथील केएलई उच्च शिक्षण आणि संशोधन अकादमी या अभिमत विद्यापीठ संस्थेच्या दीक्षांत समारंभात मार्गदर्शन केले.

दीक्षांत समारंभ हा प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा  आणि अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगूत उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांनी कधीही शिकणे थांबवू नये असे सांगितले.  "तुम्ही पदवी प्राप्त केली की शिक्षण थांबते हे एक मिथक आहे." असे उपराष्ट्रपती म्हणाले.

विद्यार्थ्यांनी राष्ट्राला नेहमीच प्रथम प्राधान्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर मानवतेची सेवा करताना आर्थिक नफ्याच्या विचारांना गौण स्थानी ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. “आर्थिक विचारांना गौण स्थानी ठेवून सेवा हे तुमचे प्राथमिक बोधवाक्य असायला हवे,” असा सल्ला त्यांनी दिला.

भारत 2047 पर्यंत जगातील सर्वात विकसित राष्ट्र बनेल यासाठी मोठे परिवर्तन घडवून आणण्याकरिता विद्यार्थ्यांनी महत्वपूर्ण योगदान देण्याचे  आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.

विद्यार्थ्यांनी अपयशाला न घाबरता समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत राहण्याचा सल्ला उपराष्ट्रपतींनी यावेळी दिला.

The health of a country depends on the health of individuals.

The entire country, at the moment, is on a marathon march towards Viksit Bharat@2047.

You are all part of this march. You have to be fighting fit! @IcmrNitm pic.twitter.com/dQzhhK8Ocp

— Vice-President of India (@VPIndia) May 27, 2024

 

India’s rich tapestry of traditional medicine, encompassing Ayurveda, Siddha, Unani, and Yoga, is a testament to the profound wisdom of our ancestors.

They embody a perfect blend of science, philosophy, and spirituality, emphasising the harmonious balance between mind, body,… pic.twitter.com/RQaqW9cCU9

— Vice-President of India (@VPIndia) May 27, 2024

 

We must have great focus on medicinal plants and herbs even at the Panchayat level, so that they may flourish under suitable weather, soil and climate conditions. At the end of the day, the plants will converge into a laboratory to help meet our basic need. @IcmrNitm pic.twitter.com/ClIdq7QRz9

— Vice-President of India (@VPIndia) May 27, 2024

 

I appeal to corporates and public leaders: they must do all they can to support research and development!

This research and development will reflect in the growth of our economy, and also in our diplomatic soft power. @IcmrNitm pic.twitter.com/iakzvds2Sg

— Vice-President of India (@VPIndia) May 27, 2024

 

Hon'ble Vice-President, Shri Jagdeep Dhankhar presided over the 14th Convocation Ceremony of KLE Academy of Higher Education & Research in Belagavi, Karnataka today.@kledeemedunive2 pic.twitter.com/hifE03UrS5

— Vice-President of India (@VPIndia) May 27, 2024

 

Hon'ble Vice-President, Shri Jagdeep Dhankhar felicitated the gold medalists at 14th Convocation Ceremony of KLE Academy of Higher Education & Research in Belagavi, Karnataka today.@kledeemedunive2 pic.twitter.com/NCHvlswMYc

— Vice-President of India (@VPIndia) May 27, 2024

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2021817) Visitor Counter : 42