राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ब्रह्मा कुमारी यांनी आयोजित केलेल्या ‘स्वच्छ आणि आरोग्यसंपन्न समाजासाठी आध्यात्मिक सक्षमीकरण’ या उपक्रमाच्या राष्ट्रीय शुभारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित

प्रविष्टि तिथि: 27 MAY 2024 3:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 मे 2024

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (27 मे, 2024) नवी दिल्ली येथे ब्रह्मा कुमारींनी आयोजित केलेल्या ‘स्वच्छ आणि आरोग्यसंपन्न समाजासाठी आध्यात्मिक सक्षमीकरण’ या उपक्रमाच्या राष्ट्रीय शुभारंभाला हजेरी लावली. 

जागतिक इतिहासाचा सुवर्ण अध्याय आणि राष्ट्रांचा इतिहास नेहमीच आध्यात्मिक मूल्यांवर आधारित असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी बोलताना सांगितले. आध्यात्मिक मूल्यांकडे दुर्लक्ष करून केवळ भौतिक प्रगतीचा मार्ग स्वीकारणे हे शेवटी विनाशकारी ठरले आहे. जगाचा इतिहास यांची साक्ष देतो, असे त्या म्हणाल्या. निरोगी मानसिकतेच्या आधारेच सर्वांगीण कल्याण शक्य आहे, हे राष्ट्रपतींनी अधोरेखित केले.

आध्यात्मिक सबलीकरण हेच खरे सशक्तीकरण आहे.  आध्यात्मिक मूल्ये सर्व धर्मातील लोकांना एकमेकांशी जोडतात, असे त्यांनी सांगितले.

स्वार्थाच्या पलीकडे जाऊन लोककल्याणाच्या भावनेने काम करणे ही आंतरिक अध्यात्माची सामाजिक अभिव्यक्ती आहे, असेही राष्ट्रपतींनी सांगितले.  लोकहितासाठी परोपकार करणे हे सर्वात महत्त्वाचे आध्यात्मिक मूल्य असल्याचे त्या म्हणाल्या. 

जगातील अनेक भागात भीती, दहशत आणि युद्धाला खतपाणी घालणाऱ्या शक्ती सक्रिय आहेत, अशा वातावरणात ब्रह्मा कुमारी संस्थेने 100 हून अधिक देशांमध्ये अनेक केंद्रांद्वारे मानवतेच्या सक्षमीकरणासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, असेही त्यांनी सांगितले. आध्यात्मिक मूल्यांचा प्रसार करून वैश्विक बंधुता मजबूत करण्याचा ब्रह्मा कुमारी संस्थेचा हा प्रयत्न अमूल्य आहे, अशा शब्दात राष्ट्रपतींनी या उपक्रमाची प्रशंसा केली. 

ब्रह्मा कुमारी ही महिलांद्वारे चालवली जाणारी जगातील कदाचित सर्वात मोठी आध्यात्मिक संस्था आहे, याबद्दल राष्ट्रपतींना आनंद व्यक्त केला.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2021799) आगंतुक पटल : 110
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Punjabi , Gujarati , Tamil