आयुष मंत्रालय

सामान्य विमा कंपन्या आणि आयुष रुग्णालय मालकांसाठी आयुष मंत्रालय आयोजित करत आहे संवेदीकरण  कार्यक्रम

Posted On: 26 MAY 2024 1:17PM by PIB Mumbai

 

विमा क्षेत्रात सखोल सामंजस्य आणि सहकार्य वाढवण्यासाठी तसेच सर्व नागरिक, आयुष रुग्णालये आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना  परवडण्याजोगी आयुष आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या हेतूने भारत सरकारचे आयुष मंत्रालय, सामान्य विमा कंपन्यांच्या कार्यकारी नेतृत्व संघांसाठी आणि आयुष रुग्णालय मालकांसाठी विशेष संवेदीकरण कार्यक्रम आयोजित करत आहे.

हा कार्यक्रम 27 मे 2024 रोजी नवी दिल्लीत अखिल भारतीय आयुर्वेद संस्था येथे होणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश केवळ लोकांसाठी आयुष उपचारांची सुलभता आणि परवडणारे दर निश्चित करणे तसेच संपूर्ण देशभरात सर्वांगीण आरोग्य आणि निरोगीपणाला प्रोत्साहन देणे एवढेच नव्हे तर भारतातील विमा संरक्षणासाठी सार्वजनिक आणि खाजगी आयुष रुग्णालयांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने सुविधा प्रदान करणे हा आहे.

आरोग्य विमा योजनांमध्ये आयुष उपचारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक असलेल्या नियामक व्यवस्था  आणि धोरण पाठींब्याबाबत या कार्यक्रमात चर्चा होईल तसेच या क्षेत्रासमोरील आव्हाने आणि संधी या दोन्हींचा सामना करण्यासाठी मुख्य संबंधितांदरम्यान  संवाद सुलभ करेल. आयुष क्षेत्रातील विमा संरक्षण, प्रमाणित उपचार मार्गदर्शक तत्त्वे (STG) आणि विमा क्षेत्रासाठी ICD कोड , विमा क्षेत्रात आयुषचा प्रसार आयुष रुग्णालयाची संभाव्यता, AIIA अर्थात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांनी मिळवलेले यश आणि त्यांच्या यशोगाथा, रोहिणी मंचावर आयुष रुग्णालयांची वर्णी, विमा संरक्षणासाठी आयुष रुग्णालयांची समावेशकता या प्रमुख मुद्द्यांवर देखील चर्चा होणार आहे. .

***

S.Kane/S.Naik/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2021709) Visitor Counter : 70