उपराष्ट्रपती कार्यालय
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उपराष्ट्रपतींनी केले मतदान, मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन सर्वांना केले
"मतदान करणे हे आपले कर्तव्य आणि अधिकार" – उपराष्ट्रपती
भारत ही जगातील सर्वात चैतन्यशील, सक्रिय आणि प्रभावी लोकशाही आहे - उपराष्ट्रपती
Posted On:
25 MAY 2024 12:10PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती जगदीप धनखर आणि डॉ. सुदेश धनखर यांनी 2024 लोकसभा निवडणुकीसाठी आज नवी दिल्लीत नॉर्थ एव्हेन्यू येथील सीपीडब्ल्यूडी सेवा केंद्रात स्थापन केलेल्या मतदान केंद्रावर मतदान केले.
लोकशाहीच्या या भव्य उत्सवात मतदान करणे, हे आपले कर्तव्य आणि अधिकार आहे, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मतदान केल्यांनंतर सांगितले.
"सर्वात चैतन्यशील, सक्रिय आणि प्रभावी लोकशाही" असणारा देश असे भारताचे वर्णन करत उपराष्ट्रपती धनखर म्हणाले की "भारत हे जगासाठी एक सर्वोत्तम उदाहरण आहे". प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावून आपले संवैधानिक कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहनही उपराष्ट्रपतींनी केले.
***
M.Pange/S.Mukhedkar/P.kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2021592)
Visitor Counter : 122