संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सशस्त्र दलांमध्ये संयुक्त संस्कृती विकसित करणारा जॉइंटनेस 2.0 उपक्रम हाच पुढचा मार्ग आहे - सीडीएस जनरल अनिल चौहान

Posted On: 21 MAY 2024 5:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 मे 2024

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी तिन्ही सेवांना संयुक्त क्रियान्वयन धोरण आराखडा बनवण्याच्या दिशेने वाटचाल करताना एक संयुक्त संस्कृती निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.  नवी दिल्लीतील युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया (युएसआय) येथे आयोजित 22 व्या मेजर जनरल समीर सिन्हा स्मृती व्याख्यानमालेचा एक भाग म्हणून ‘जॉइंटमॅनशिप: द वे अहेड’ या विषयावर बोलताना, सीडीएस चौहान यांनी सशस्त्र दलांमध्ये संयुक्त संस्कृती विकसित करणारा जॉइंटनेस 2.0 उपक्रम भविष्यात, पुढे जाण्याचा मार्ग आहे, असे सांगितले.

जॉइंटनेस 1.0 हे सेवांमध्ये चांगले सौहार्द आणि एकमत निर्माण करण्यासंदर्भात होते आणि यात कोणतेही मोठे मतभेद नसल्यामुळे संयुक्तता उपक्रमाच्या पुढील स्तराकडे म्हणजेच जॉइंटनेस 2.0 सुरू करण्याची प्रेरणा मिळाली आहे, असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणाले.

तिन्ही सेवांची वेगळी संस्कृती अधोरेखित करत सीडीएस चौहान यांनी सशस्त्र सेवांमध्ये चौथी संस्कृती निर्माण करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.  "संयुक्त संस्कृती सेवा विशिष्ट संस्कृतीपेक्षा वेगळी असली तरी, प्रत्येक सेवेच्या विशिष्टतेचा आदर करणे आवश्यक आहे. आपण प्रत्येक सेवेतील सर्वोत्कृष्ट पद्धती वेगळी करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे, आणि सर्वात सामान्य घटक समाविष्ट करण्यावर समाधान मानण्याऐवजी, सर्वोच्च सामान्य घटकाचा समावेश केला पाहिजे," असेही ते म्हणाले. राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये तीनही सेवांच्या सहभागासह संयुक्त संस्कृतीच्या संवर्धनासाठी प्रक्रिया सुरू असलेल्या प्रतीकात्मकतेच्या विविध उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला.

सीडीएस चौहान यांनी कार्यात्मक एकात्मिक थिएटर कमांडच्या निर्मितीसाठी संयुक्तता आणि एकात्मिकरण हे घटक पूर्व-आवश्यकता असल्याचे सांगितले आणि अशा कमांड्सचे महत्त्वही स्पष्ट केले.  "अशा कमांडच्या निर्मितीमुळे वृद्धी-प्रशिक्षण-कायम राखा (RTS) आणि इतर प्रशासकीय कार्यांपासून 'ऑपरेशनल' फंक्शन्स वेगळे होतील आणि ऑपरेशनल कमांडरला सुरक्षेच्या बाबींवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल," असेही ते म्हणाले.

थिएटर कमांड ही शेवटची पायरी नसून सुधारणांच्या पुढील संचाची सुरुवात असेल, असे त्यांनी सांगितले. इंटिग्रेटेड थिएटर कमांड्समुळे सिंगल टू मल्टी डोमेन ऑपरेशन्स, स्पेस आणि सायबर स्पेस पारंपरिक डोमेनमध्ये जोडणे, युद्धभूमीवरील माहितीचे डिजिटायझेशन आणि व्हिज्युअलायझेशन, नेट सेंट्रिक टू डेटा सेंट्रिक अशा अनेक सुधारणा घडून येतील, असे सीडीएस चौहान यांनी सांगितले.

 

S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2021246) Visitor Counter : 109


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu