संरक्षण मंत्रालय
फर्स्ट ट्रेनिंग स्क्वाड्रन (1TS) वर 106 इंटिग्रेटेड ऑफिसर ट्रेनीज कोर्स (IOTC) चे सागरी प्रशिक्षण
Posted On:
12 MAY 2024 5:31PM by PIB Mumbai
खडतर सागरी प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, 106 इंटिग्रेटेड ऑफिसर ट्रेनीज कोर्स (IOTC) साठी ऑनबोर्ड फर्स्ट ट्रेनिंग स्क्वॉड्रन (1TS) वर 9 मे 24 रोजी समारोपाचे रात्रीचे भोजन आयोजित करण्यात आले. व्हाईस अॅडमिरल व्ही. श्रीनिवास, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, दक्षिणी नौदल कमांड, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थींसह 99 सागरी प्रशिक्षणार्थींनी 1TS च्या पोर्टलवरून यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. एफओसी-इन-सी साउथ ने, प्रशिक्षणाचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल प्रशिक्षणार्थींचे कौतुक केले आणि गुणवंत प्रशिक्षणार्थींना ट्रॉफी प्रदान केल्या.
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू सागरी प्रशिक्षणार्थी साठी असलेला टेलीस्कोप पुरस्कार मिडशिपमन सी प्रणीत यांना देण्यात आला तर मिडशिपमॅन पीपीके रेड्डी यांना एकूणच ऑर्डर ऑफ मेरिटमध्ये प्रथम स्थान मिळाल्याबद्दल बायनॉक्युलर पुरस्कार देण्यात आला.
प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना, प्रमुख पाहुण्यांनी त्यांना ज्ञान मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याचे आणि सागरी वातावरणाची सतत बदलती युद्धकला आणि क्लृप्त्या, तंत्रज्ञान आणि रणनीती यांच्या गतीशीलतेशी जुळवून घेण्याचे आवाहन केले. वेग, सुरक्षितता आणि मनोबल राखून लोकांप्रती अत्यंत व्यावसायिकपणे आणि सहानुभूतीने वागणाऱ्या लष्करी नेत्याची वैशिष्ट्ये त्यांनी ठळकपणे मांडली. ‘सेवा परमो धर्म’ किंवा ‘स्वतःआधी इतरांची सेवा’ हे नेहमीच ब्रीदवाक्य असावे, असे त्यांनी सांगितले.
11 मे 24 रोजी आय एन एस तीर वर एक विभागणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्याचा दक्षिण नौदल कमांड, CSO(TRG) रीअर ऍडमिरल सतीश शेणई यांनी आढावा घेतला. हे अधिकारी आता विविध आघाड्यांवर नौदलाच्या युद्धनौका आणि तटरक्षक दलाच्या पश्चिम आणि पूर्व सागरी किनाऱ्यावरील गस्ती नौकांमध्ये तात्कालिक प्रशिक्षणासाठी सामील होतील. मॉरिशस तटरक्षक दलातील सहाय्यक कमांडंट प्रिशिता जुग्गामाह 1TS मधून सागरी प्रशिक्षण पूर्ण करणारी पहिली महिला प्रशिक्षणार्थी ठरली.



***
S.Kane/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2020383)