संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 9 आणि 10 मे 2024 रोजी सशस्त्र दलांची संयुक्तता आणि एकात्मिकता यांवर आधारित दोन दिवसीय परिषदेचे आयोजन

Posted On: 09 MAY 2024 2:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मे 2024

देशातील तिन्ही सेनादलांच्या सध्या सुरु असलेल्या संयुक्तता आणि एकात्मिकता विषयक उपक्रमांना गती देण्याचा भारतीय सशस्त्र दलांचा मानस आहे. 

नाविन्यपूर्ण सुधारणात्मक कल्पना आणि उपक्रमांच्या निर्मितीच्या उद्देशाने 08 एप्रिल 2024 रोजी, परिवर्तन चिंतन या तिन्ही सेनादलांच्या प्रशिक्षण संस्थाप्रमुखांच्या पहिल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच उपक्रमाचा पुढचा भाग म्हणून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ  (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांच्या अध्यक्षतेखाली, नवी दिल्ली येथे येत्या 9 आणि 10 मे 2024 रोजी परिवर्तन चिंतन – II या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

तिन्ही सेनादलप्रमुखांच्या समितीच्या उपसमित्यांचे सदस्य, त्यांचे कायमस्वरूपी अध्यक्ष असलेले सीडीएस तसेच तिन्ही सेनादलांचे प्रमुख या परिषदेमध्ये उपस्थित राहून, विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतील तसेच संयुक्तता आणि एकात्मिकता यांच्या माध्यमातून सेनादलांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने इच्छित परिणाम साधण्यासाठी आवश्यक सुधारणांवर आधारित संकल्पना मांडतील.

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2020068) Visitor Counter : 87