इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

सीआयएससीई ने विद्यार्थ्यांना सोयीस्कर प्रवेश प्रक्रियेसह केले सक्षम: डिजीलॉकरद्वारे 2024 च्या परीक्षेच्या निकालांची घोषणा आणि गुणपत्रक आणि प्रमाणपत्रांची उपलब्धता

Posted On: 07 MAY 2024 3:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 मे 2024

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयएससीई), ने एका अग्रगण्य डिजिटल परिवर्तन उपक्रमा अन्वये, डिजीलॉकर प्लॅटफॉर्म द्वारे 2024 साठी आयसीएसई (वर्ग:दहावी) आणि आयएससी (वर्ग:बारावी) परीक्षांचे निकाल डिजिटल पद्धतीने जाहीर करण्यासाठी डिजीलॉकर प्लॅटफॉर्मचे सहकार्य घेतले आहे. याव्यतिरिक्त, सीआयएससीईने निकाल घोषित होताच डिजीलॉकरद्वारे प्रमाणपत्रे आणि मार्कशीट उपलब्ध करून दिली. यावर्षी आयसीएसईसाठी एकूण 2,43,617 विद्यार्थी बसले होते, तर 99,901 आयएससी परीक्षेला बसले होते.

3.43 लाखांहून अधिक विद्यार्थी आता निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच डिजीलॉकरवर सीआयएससीईद्वारे जारी केलेल्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांसारख्या शैक्षणिक कागदपत्रे  विनाअडथळा प्राप्त करू शकतात.

एकूण 99.47 टक्के विद्यार्थी आयसीएसई 2024 मध्ये उत्तीर्ण झाले, ज्यामध्ये मुलींनी मुलांपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली (99.65 टक्के मुली विरुद्ध 99.31 टक्के मुले). दुसरीकडे आयएससी परीक्षेत 98.19 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्येही मुलांपेक्षा मुलींनी चांगली कामगिरी केली (98.92 टक्के मुली विरुद्ध 97.53 टक्के मुले).

डिजीलॉकर हे डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत येणारे एक प्रमुख व्यासपीठ आहे. शालांत परीक्षा मंडळे, विद्यापीठे आणि इतर संस्थांद्वारे डिजिटल स्वरूपात शैक्षणिक कागदपत्रे जारी करण्यासाठी आणि  प्रवेश मिळवण्यासाठी सुरक्षित,विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक उपाय प्रदान करून हे क्रांतिकारी पाऊल आणखीन सक्षम केले आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  • भारत आणि परदेशातील 2,42,328 विद्यार्थ्यांनी आयसीएसई ची परीक्षा उत्तीर्ण केली, तर 98,088 विद्यार्थी आयएससी उत्तीर्ण झाले.
  • निकाल जाहीर होताच डिजीलॉकरवर गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे डिजिटल स्वरूपात उपलब्ध होतात.
  • विद्यार्थी कधीही, कुठेही त्यांच्या मूळ डिजिटल दस्तऐवजांबद्दलची माहिती सादर करू शकतात.

सीआयएससीईचे मुख्य कार्यकारी आणि सचिव डॉ.जोसेफ इमॅन्युएल यांनी जाहीर केले आहे की,परीक्षेचे निकाल आता डिजीलॉकर आणि सीआयएससीई वेबसाइटवर निकाल जाहीर केल्यावर लगेच उपलब्ध होतील.याव्यतिरिक्त,त्यांनी डिजीलॉकर या व्यासपीठावर शैक्षणिक दस्तऐवजांच्या उपलब्धतेबद्दलही चर्चा केली.

S.Patil/G.Deoda/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2019856) Visitor Counter : 50