ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय
ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाच्या महिला कर्मचाऱ्यांना "स्वसंरक्षण" या विषयाबद्दल जागरूक करण्याच्या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन
Posted On:
01 MAY 2024 8:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मे 2024
ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाच्या सहसचिव आणि मंत्रालयातील अंतर्गत तक्रार समितीच्या अध्यक्ष अनुराधा एस. चगती यांनी मोनालिसा डॅश जेएस, श्रीमती सुचिता गुप्ता, एसए यांच्या सहकार्याने ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाच्या सर्व महिला कर्मचारी आणि विज्ञान भवन अनेक्स संकुलात तैनात सीआयएसएफ स्वसंरक्षणाशी निगडित तंत्रांसह महिलांशी संबंधित समस्यांवर एका सत्राचे आयोजन केले होते. समितीच्या बाह्य सदस्य वैशाली धूत या समितीच्या इतर सदस्यांसह उपस्थित होत्या. धूत या स्त्रीबल फाउंडेशनच्या सीईओ आहेत. त्या एक अनुभवी स्व-संरक्षण प्रशिक्षक असून तायक्वांदो मार्शल आर्ट्समध्ये फोर्थ डान ब्लॅक बेल्ट पदवीधारक आहेत.
सर्वसमावेशक सत्रामध्ये मूलभूत तंत्रे, परिस्थितीजन्य जागरूकता, पंच, ब्लॉक्स आणि इतर स्वसंरक्षण तंत्रांचा समावेश आहे. स्वत: ची काळजी घेण्यास प्राधान्य देण्याच्या महत्त्वावर धूत यांनी जोर दिला आणि प्रत्येक महिलेला व्यायाम आणि स्व-संरक्षण प्रशिक्षणासाठी दररोज किमान 10 मिनिटे समर्पित करण्यास प्रोत्साहित केले.
ही कौशल्ये केवळ वैयक्तिक सुरक्षेची खात्री देत नाहीत तर महिलांना इतरांना आधार आणि संरक्षण देण्यास सक्षम करतात हे त्यांनी अधोरेखित केले.
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2019372)
Visitor Counter : 67