संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एअर मार्शल नागेश कपूर यांनी एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ ट्रेनिंग कमांड म्हणून स्वीकारला पदभार

Posted On: 01 MAY 2024 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 मे 2024

 

एअर मार्शल नागेश कपूर यांनी 01 मे 2024 रोजी एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (AOC-in-C) ट्रेनिंग कमांड (TC) म्हणून पदभार स्वीकारला.

एअर मार्शल एन कपूर यांना 06 डिसेंबर 1986 रोजी भारतीय हवाईदलाच्या सैनिक शाखेत नियुक्त करण्यात आले. ते राष्ट्रीय संरक्षण अकादमी, संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. एक पात्र हवाई उड्डाण प्रशिक्षक आणि फायटर कॉम्बॅट लीडर म्हणून त्यांच्याकडे 3400 तासांपेक्षा जास्त तास विमान उड्डाणाचा अनुभव आहे.

  

आपल्या शानदार कारकिर्दीत, एअर मार्शल यांनी अनेक फील्ड आणि कार्यालयीन पदे भूषवली आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मध्यवर्ती क्षेत्रातील फायटर स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर, पश्चिम क्षेत्रातील विमानतळाचे स्टेशन कमांडर आणि प्रीमियर एअर बेसचे एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून सेवा बजावली आहे. त्यांनी हवाई दल अकादमीमध्ये मुख्य प्रशिक्षक (उड्डाण) आणि वेलिंग्टन येथील प्रतिष्ठित डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज मध्ये कर्मचारी निदेशक म्हणून काम केले आहे. हवाईदल अकादमीमधील त्यांच्या कार्यकाळात, या हवाईदल अधिकाऱ्यांनी भारतीय हवाईदलात पीसी -7 एमके Il विमाने समाविष्ट करण्यात आणि कार्यान्वित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी पाकिस्तानचे संरक्षण राजदूत सहायक म्हणून राजनीतिक कामगिरीही पार पाडली आहे. त्यांनी भूषविलेल्या कार्यालयीन नियुक्त्यांमध्ये हवाई मुख्यालयातील असिस्टंट चीफ ऑफ एअर स्टाफ ऑपरेशन्स (स्ट्रॅटेजी), साउथ वेस्टर्न एअर कमांडमध्ये एअर डिफेन्स कमांडर आणि सेंट्रल एअर कमांड मुख्यालयातील वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी यांचा समावेश आहे. सध्याची नियुक्ती स्वीकारण्यापूर्वी त्यांनी हवाई मुख्यालयात हवाई अधिकारी कार्मिक प्रमुख म्हणून सेवा बजावली आहे.

  

एअर मार्शल यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना 2008 मध्ये वायु सेना पदक आणि 2022 मध्ये अति विशिष्ट सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2019317) Visitor Counter : 100