दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या तिमाहीसाठी “भारतीय दूरसंचार सेवा कामगिरी निदर्शक अहवाल” जारी केला
Posted On:
23 APR 2024 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 एप्रिल 2024
ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी “भारतीय दूरसंचार सेवा कामगिरी निदर्शक अहवाल” जारी केला आहे. या अहवालातून भारतातील दूरसंचार सेवांच्या व्यापक दृष्टिकोनाची माहिती मिळते. तसेच मुख्यतः सेवा पुरवठादारांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारावर, 1 ऑक्टोबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत देशातील दूरसंचार सेवा तसेच केबल टीव्ही, डीटीएच आणि रेडिओ प्रसारण सेवांच्या संदर्भातील महत्त्वाचे मापदंड आणि विकासाचे कल यांच्याविषयी या अहवालातून अधिक माहिती मिळते.
अहवालाचा कार्यकारी सारांश सोबत जोडला आहे. उपरोल्लेखित संपूर्ण अहवाल टीआरएआयच्या संकेतस्थळावर (www.trai.gov.in या संकेतस्थळावरील http://www. Trai.gov.in/release-publication/reports/performance-indicators-reports या लिंकमध्ये) उपलब्ध आहे. या अहवालाविषयी काही सूचना करायच्या असल्यास अथवा स्पष्टीकरण हवे असल्यास ट्रायचे सल्लागार (एफ आणि ईए) अमित शर्मा यांच्याशी +91-11-23234367 या दूरध्वनी क्रमांकावर तसेच advfea2@trai.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क करता येईल.
कार्यकारी सारांश मिळवण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
S.Kane/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2018602)
Visitor Counter : 109