अर्थ मंत्रालय

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन (तात्पुरते) केंद्रीय अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा 1.35 लाख कोटी रुपयांनी म्हणजे 7.40 % अधिक


आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सकल प्रत्यक्ष कर संकलन (तात्पुरते) वार्षिक (Y-o-Y) 18.48% ची वाढ नोंदवत 23.37 लाख कोटी रुपये

Posted On: 21 APR 2024 1:01PM by PIB Mumbai

 

प्रत्यक्ष कर संकलनाचे तात्पुरते आकडे दर्शवतात की 2023-24 या  आर्थिक वर्षात निव्वळ संकलन 19.58 लाख कोटी रुपये असून ते मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 17.70% नी अधिक आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 16.64 लाख कोटी रुपये झाले होते.

आर्थिक वर्ष 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रत्यक्ष कर महसुलासाठी अर्थसंकल्पीय अंदाज (बीई)   18.23 लाख कोटी रुपये होता जो सुधारित करण्यात आला आणि सुधारित अंदाज (आरई) 19.45 लाख कोटी रुपये निश्चित करण्यात आला होता.प्रत्यक्ष कर संकलनाची तात्पुरती आकडेवारी ही अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा  7.40 % अधिक.आणि सुधारित अंदाजापेक्षा 0.67%. अधिक आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्रत्यक्ष  करांचे सकल संकलन (तात्पुरते) (परताव्यासाठी समायोजित करण्यापूर्वी) 23.37 लाख कोटी रुपये आहे जे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत एकूण संकलनापेक्षा 18.48% ची वाढ दर्शवते.  आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये प्रत्यक्ष करांचे सकल  संकलन 19.72 लाख कोटी रुपये होते.

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सकल कॉर्पोरेट कर संकलन (तात्पुरते) 11.32 लाख कोटी रुपये आहे, जे मागील आर्थिक वर्षातील 10 लाख कोटी रुपये एकूण कॉर्पोरेट कर संकलनाच्या तुलनेत 13.06% ने अधिक आहे. 

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये निव्वळ कॉर्पोरेट कर संकलन (तात्पुरते) 9.11 लाख कोटी रुपये आहे जे मागील आर्थिक वर्षातील 8.26 लाख कोटी रुपये निव्वळ कॉर्पोरेट कर संकलनाच्या तुलनेत 10.26% ने अधिक आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सकल  वैयक्तिक प्राप्तीकर संकलन (एसटीटीसह) (तात्पुरते) 12.01 लाख कोटी रुपये आहे जे मागील आर्थिक वर्षातील 9.67 लाख कोटी रुपये सकल वैयक्तिक आयकर संकलन (एसटीटीसह) च्या तुलनेत 24.26% ने अधिक आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये निव्वळ वैयक्तिक प्राप्तीकर संकलन (एसटीटीसह) (तात्पुरते) 10.44 लाख कोटी रुपये आहे जे मागील आर्थिक वर्षातील 8.33 लाख कोटी रुपये निव्वळ वैयक्तिक प्राप्तीकर संकलनाच्या (एसटीटीसह) तुलनेत 25.23% ने अधिक आहे. 

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 3.79 लाख कोटी रुपये परताव्याच्या रुपात जारी करण्यात आले आहेत, जे  आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये परताव्याच्या रुपात जारी करण्यात आलेल्या 3.09 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 22.74% ने अधिक आहेत. 

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2018378) Visitor Counter : 89