राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींनी होळीच्या पूर्वसंध्येला जनतेला दिल्या शुभेच्छा

Posted On: 24 MAR 2024 8:38PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, होळीच्या पूर्वसंध्येला, सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या संदेशात राष्ट्रपती म्हणतात— “ होळीच्या या पवित्र दिनी, मी भारतात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना शुभेच्छा देते.

होळी हा एक चैतन्यमय आणि आनंददायी उत्सव असून, आपल्या सर्वांच्या आयुष्यात आशा आणि उत्साह घेऊन येणारा हा सण आहे. होळीचे हे विविध रंग, आपल्या देशातील वैविध्याचेच प्रतीक आहेत. हा सण, सर्व लोकांमध्ये परस्परांविषयी स्नेह, एकता आणि बंधुभावाला प्रोत्साहन देणारा सण आहे. आपल्या सांस्कृतिक परंपरा अधिक दृढ करण्याची प्रेरणा हा उत्सव आपल्याला देतो.

हा रंगाचा उत्सव, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात, आनंद घेऊन येणारा आणि नव्या उत्साहाने देशबांधणीसाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारा ठरो.

राष्ट्रपतींचा संपूर्ण संदेश वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2016290) Visitor Counter : 62