पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान भूतानमध्ये दाखल
Posted On:
22 MAR 2024 10:35AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 - 23 मार्च 2024 या कालावधीत भूतानच्या शासकीय दौऱ्यावर असून आज ते पारो येथे दाखल झाले. भारत आणि भूतान यांच्यातील नियमित उच्चस्तरीय आदानप्रदान आणि सरकारच्या 'शेजारी प्रथम' धोरणावर भर देणे या अनुषंगाने हा दौरा आहे.
भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे यांनी पारो विमानतळावर पंतप्रधानांचे दिमाखादार औपचारिक स्वागत केले.
या भेटीदरम्यान भूतानचे राजे महामहीम जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि भूतानचे चौथे राजे महामहीम जिग्मे सिंग्ये वांगचुक यांना पंतप्रधान भेटतील. भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे यांच्याशी मोदी चर्चाही करणार आहेत.
भारत सरकारच्या सहकार्याने थिम्पू येथे बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक ग्यालत्सुएन जेत्सुन पेमा माता बालक रुग्णालयाचे उद्घाटनही पंतप्रधान करतील.
***
JPS/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2016039)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam