भारतीय निवडणूक आयोग

प्राप्तिकर संचालनालय (तपास), दिल्लीने लोकसभा निवडणुका 2024 शी संबंधित पूर्णवेळ नियंत्रण कक्ष आणि 9868168682 हा टोल फ्री मदत क्रमांक केला स्थापन


या नियंत्रण कक्षाद्वारे, दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात संशयित हालचाली/ रोकड, सोने अथवा इतर मौल्यवान गोष्टींचे वितरण अशा प्रकारांवर याळा घालता येईल

दिल्लीत निवडणूक काळात आचार संहिता लागू असेपर्यंत हा नियंत्रण कक्ष कार्यरत असेल

Posted On: 20 MAR 2024 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 20 मार्च 2024

निवडणूक काळात, काळ्या पैशांचा गैरवापर थांबवण्यासाठी निवडणूक आयोगाला सहाय्य करण्याच्या  कटिबद्धतेअंतर्गत, प्राप्तिकर विभाग, लोकसभेच्या 2024 च्या सर्वसाधारण निवडणुका मुक्त आणि निष्पक्षपणे व्हाव्यात, यासाठी योगदान देण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करत आहे. 

हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, प्राप्तिकर संचालनालय (तपास) दिल्लीने अनेक उपाययोजना हाती घेतल्या असून, त्याद्वारे, बेहिशेबी रोख रक्कम, सोने आणि इतर मौल्यवान वस्तू, ज्यांचा वापर मतदानासाठी होऊ शकेल, अशा संशयित वस्तू आणि हालचाली यांच्यावर, आचार संहितेच्या काळात नजर ठेवता येऊ शकेल.

इतर उपाययोजनांबरोबरच, संचालनालयाने नवी दिल्लीतल्या नागरी केंद्रामध्ये 24X7 म्हणजेच पूर्णवेळ  नियंत्रण कक्ष उघडला आहे आणि एक टोल-फ्री क्रमांक देखील जारी केला आहे, जिथे कोणतीही व्यक्ती संवाद साधू शकते. तसेच, दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात रोख, सोने आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या संशयास्पद हालचाली/वितरणासंदर्भात प्राप्तिकर विभागाला कोणतीही माहिती देऊ शकते. या नियंत्रण कक्षाचा तपशील खालीलप्रमाणे आहेः

खोली क्र. 17, तळमजला, सी-ब्लॉक, नागरी केंद्र, नवी दिल्ली-110002 टोल फ्री नंबरः 18001123300

लँडलाईन नंबरः 011-232312/31/67/76 टोल फ्री मोबाईल क्रमांक 9868168682

रहिवासी टोल-फ्री क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्यांना नाव किंवा ओळखीचे इतर तपशील यासारखे कोणतेही वैयक्तिक तपशील उघड करण्याची गरज नाही. मिळालेली माहिती विश्वासार्ह आणि कारवाई करण्यायोग्य असणे महत्त्वाचे असेल.

नियंत्रण कक्ष दिल्लीतील आदर्श आचारसंहितेच्या संपूर्ण कालावधीत म्हणजेच 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या घोषणेच्या तारखेपासून ते दिल्लीतील निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत  कार्यरत राहील.मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका पार पडाव्यात, यासाठी नागरिकांनी दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या संदर्भात संबंधित माहिती संचालनालयाला देऊन त्यांची मदत करावी, अशी विनंती, संचालनालयाने केली आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त  ठेवली जाईल.

S.Patil/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2015778) Visitor Counter : 113