इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय स्टार्टअप केंद्र : स्टार्टअप महाकुंभाच्या विस्तीर्ण परिदृश्यामध्ये नवोन्मेषाचे सक्षमीकरण, विकासाला चालना आणि यशाला गवसणी

Posted On: 19 MAR 2024 4:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 19 मार्च 2024

स्टार्टअप महाकुंभ  2024 ही  भारताच्या चैतन्यपूर्ण स्टार्टअप कार्यक्षेत्राला एकाच छताखाली एकत्र आणणाऱ्या  अभूतपूर्व कार्यक्रमाची सुरूवात असून  नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 18-20 मार्च 2024 दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.'भारतात नवोन्मेष ' या दमदार  संकल्पनेसह, विविध क्षेत्रातील स्टार्टअप्स, गुंतवणूकदार, इनक्यूबेटर, प्रवेगक आणि उद्योजकांसाठी नवोन्मेष , नेटवर्किंग सुलभ करणे आणि वृद्धीच्या  संधी वाढवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान  मंत्रालय स्टार्टअप केंद्र हे या  कार्यक्रमातील प्रमुख सहभागांपैकी एक असून  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान   दालन आज नवोन्मेष आणि उद्योजकतेचे केंद्र म्हणून उदयास आले आहे. 40+ पेक्षा अधिक अग्रगण्य  स्टार्टअप्सना त्यांच्या अत्याधुनिक नवोन्मेषाचे   प्रदर्शन करण्याची संधी तसेच स्टार्टअप्ससाठी उद्योग तज्ञ, गुंतवणूकदार आणि संभाव्य भागीदारांबरोबर सहभाग वाढवण्यासाठी , बहुमोल संबंध  आणि विकासाच्या  संधींना प्रोत्साहन देण्यासाठी दमदार मंच उपलब्ध झाला आहे. उपस्थितांना या उदयोन्मुख स्टार्टअप्सची सर्जनशीलता, कल्पकता आणि क्षमता जाणून घेण्याची संधी मिळाली असून या कार्यक्रमाची सहयोगात्मक भावना आणखी समृद्ध झाली आहे .

स्टार्टअप कार्यक्षेत्रातील महत्वपूर्ण आव्हानांवर मात करणे आणि संधीं उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने या कार्यक्रमात विचारमंथन होत आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान  मंत्रालय स्टार्टअप केंद्रचे  मुख्य कार्यकारी अधिकारी  जीज विजय यांनी अशाच एका परिसंवादात, "डीपटेक वित्तपुरवठा  संशोधन-आधारित स्टार्टअप्सबाबत व्हेंचर कॅपिटलचा  दृष्टीकोन" यावर लक्ष केंद्रित करण्याबाबतव . विशेषत: सखोल तंत्रज्ञान आणि संशोधन-आधारित नवोन्मेषावर  आधारलेल्या स्टार्टअप्ससाठी अशा  निधीच्या गुंतागुंतीवर मार्ग काढण्याबाबत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

याव्यतिरिक्त, स्टार्टअप्सच्या वृद्धीला  आणि विकासाला चालना देण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान  मंत्रालय स्टार्टअप केंद्राने या  कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्टार्टअप तज्ज्ञांचे मार्गदर्शन म्हणजेच मास्टरक्लासचे आयोजन केले. धडाडीच्या  स्टार्टअप कार्यक्षेत्रामध्ये  विकास आणि यशाला चालना देण्याच्या  उद्देशाने स्टार्टअप्सना महत्वपूर्ण सूचना , व्यावहारिक ज्ञान आणि नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा मास्टरक्लास आयोजित करण्यात आला .

S.Kane/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2015544) Visitor Counter : 125