माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारताचे संरक्षण निर्यात मूल्य 2 वर्षांत 40,000 कोटी रुपयांपर्यंत वाढेल: केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर
प्रविष्टि तिथि:
13 MAR 2024 8:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मार्च 2024
स्वतःची संरक्षणक्षमता वाढविण्याचा सरकारचा दृढनिश्चय आहे असे केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज सांगितले. भारताचे आजमितीस संरक्षण उत्पादन एक लाख कोटी रुपये मूल्याचे तर संरक्षण निर्यात सोळा हजार कोटी रुपये मूल्याची आहे. येत्या दोन वर्षांत हे निर्यात मूल्य 40 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तथापि, युद्ध कोणत्याही देशासाठी विनाशकारी आहे आणि हे चार वेळा युद्धाची झळ बसलेल्या भारतालाच इतर देशांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कळू शकते, असे त्यांनी सांगितले. आज नवी दिल्ली येथे एका पुस्तक प्रकाशन सोहोळ्यात बोलताना मंत्री महोदयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा पुनरुच्चार केला की ही युद्धाची नाही तर चर्चा आणि संवादाची वेळ आहे.
इस्रायल एक राष्ट्र म्हणून बिकट परिस्थितीतही तग धरून लवचिकतेचे एक आदर्श उदाहरण बनले आहे आणि हा देश नाविन्यपूर्ण क्षेत्रातही अग्रेसर आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर नरसंहाराच्या भयावह परिस्थितीतून सावरलेला इस्रायल आज स्वबळावर उभा असलेला देश आहे असे मंत्री महोदयांनी निदर्शनास आणले.
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2014391)
आगंतुक पटल : 141