रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

राष्ट्रीय महामार्गांवर गैरसोय होऊ नये यासाठी ‘पेटीएम फास्टॅग’ (FASTag) वापरकर्त्यांनी 15 मार्च 2024 पूर्वी इतर कोणत्याही बँकेद्वारे जारी करण्यात आलेला नवीन फास्टॅग घ्यावा अशी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (एनएचएआय) सूचना

Posted On: 13 MAR 2024 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 मार्च 2024

 

राष्ट्रीय महामार्गांवरील Paytm FASTag (पेटीएम फास्टॅग) वापरकर्त्यांना विनाखंडित प्रवासाचा अनुभव मिळावा, आणि टोल प्लाझावर त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी या प्रवाशांनी 15 मार्च 2024 पूर्वी दुसऱ्या कोणत्याही बँके द्वारे जारी करण्यात आलेला नवीन FASTag घ्यावा, अशी सूचना एनएचएआय (NHAI), अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करताना द्यावा लागणारा दंड अथवा दुप्पट शुल्क आकारणी टाळायला मदत होईल. 

पेटीएम पेमेंट्स बँकेवरील निर्बंधांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांना 15 मार्च 2024  नंतर त्यांच्या फास्टॅग खात्यामध्ये रिचार्ज अथवा  बॅलन्स टॉप-अप करता येणार नाही. तथापि, त्यांना निर्धारित तारखे नंतर टोल भरण्यासाठी त्यांची शिल्लक रक्कम वापरता येईल.

पेटीएम फास्टॅग शी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी अथवा सहाय्यासाठी, वापरकर्ते त्यांच्या संबंधित बँकांशी संपर्क साधू शकतील अथवा IHMCL वेबसाइटवर दिलेली प्रश्नोत्तरे (FAQ) पाहू शकतील. देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर अखंड प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी सर्व पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांनी सक्रियपणे उपाययोजना कराव्यात, असे आवाहन एनएचएआय ने  केले आहे.

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2014132) Visitor Counter : 87