पंतप्रधान कार्यालय

सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

Posted On: 08 MAR 2024 2:13PM by PIB Mumbai

 

सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

एक्स संदेशात पंतप्रधान म्हणाले :

"राष्ट्रपतींनी @SmtSudhaMurty जी यांची राज्यसभेवर नियुक्ती  केल्याचा मला आनंद आहे. सामाजिक कार्य, लोकसेवा आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रांमध्ये सुधाजी यांचे योगदान उत्तुंग  आणि प्रेरणादायी आहे. राज्यसभेतील त्यांची उपस्थिती आपल्या 'नारी शक्ती' चे द्योतक  आहे, जे  आपल्या देशाचे भवितव्य घडवण्याच्या महिलांच्या सामर्थ्याचे आणि क्षमतेचे उदाहरण आहे. त्यांना फलदायी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा ".

***

N.Chitale/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2012688) Visitor Counter : 87