पंतप्रधान कार्यालय
महिला दिनाचे औचित्य साधून पंतप्रधानांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 100 रुपयांची कपात केली घोषित
Posted On:
08 MAR 2024 8:52AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजच्या महिला दिनी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार लक्षणीयरीत्या कमी होईल, विशेषत: आपल्या नारी शक्तीला याचा लाभ होईल असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
“महिला दिनाचे औचित्य साधून आज आम्ही एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 100 रुपये सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या नारी शक्तीचे जीवन सुखकर करण्याबरोबरच कोट्यवधी कुटुंबांचा आर्थिक भार देखील कमी होईल. या निर्णयामुळे पर्यावरण संरक्षणात देखील मदत होईल आणि संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहील. "
“आजच्या महिला दिनी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार लक्षणीयरीत्या कमी होईल, विशेषत: आपल्या नारी शक्तीला याचा लाभ होईल. “
स्वयंपाकाचा गॅस आणखी परवडणारा बनवून, कुटुंबांच्या कल्याणाला हातभार लावण्याचे आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे. हे महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांचे जीवन सुखकर बनवण्याप्रती आमच्या वचनबद्धतेला अनुसरून आहे.”
***
Jaidevi PS/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2012598)
Visitor Counter : 153
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam