गृह मंत्रालय

अंमली पदार्थांना  आळा घालण्यात मोदी सरकारला लाभलेल्या यशाबद्दल, केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केल्या तीन ध्वनी-चित्रफिती


अंमली पदार्थांचा शोध, अंमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करणे, गुन्हेगारांना अटक आणि व्यसनाधीनांचे पुनर्वसन याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, आपला देश हे लक्ष्य वेगाने साध्य करत आहे - अमित शाह

अंमली पदार्थांसंदर्भात मोदी सरकारच्या कठोर धोरणाचे प्रभावी परिणाम दिसत असून, या संदर्भात अटक केलेल्यांच्या संख्येत आणि जप्तीच्या प्रमाणात झालेली प्रचंड वाढ, म्हणजे या धोरणाची फलनिष्पत्ती.

2006-13 या कालावधीत जप्त केलेल्या 1.52 लाख किलो अंमली पदार्थांच्या तुलनेत मोदी सरकारच्या काळात जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचे प्रमाण दुपटीने वाढून झाले 3.95 लाख किलो

2006-13 या कालावधीतील 768 कोटी रुपयांच्या तुलनेत मोदी सरकारच्या काळात जप्त केलेल्या अंमली पदार्थांचे मूल्य 30 पटीने वाढून पोहोचले 22,000 कोटी रुपयांपर्यंत

Posted On: 03 MAR 2024 5:49PM by PIB Mumbai

 

अंमली पदार्थांना  आळा घालण्यात मोदी सरकारला लाभलेल्या यशाबद्दल, केंद्रीय गृह मंत्रालयाने आज तीन ध्वनी-चित्रफिती  जारी केल्या. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर याबाबत टिप्पण्यांची आणि ध्वनी-चित्रफितींची मालिका जारी केली आहे.

अंमली पदार्थांच्या व्यापाराबाबत मोदी सरकारच्या कठोर धोरणाचे प्रभावी परिणाम दिसू लागले आहेत. या संदर्भात अटक केलेल्यांच्या संख्येत आणि जप्तीच्या प्रमाणात झालेली प्रचंड वाढ, ही या धोरणाची फलनिष्पत्ती आहे , " असे शहा यांनी आपल्या एका टिप्पणीत म्हटले आहे.

दुसऱ्या एका टिप्पणी मध्ये शाह म्हणाले, “ पंतप्रधान मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली सरकार आणि गुन्हे प्रतिबंधक संस्था यांच्यातील समन्वय, सहकार्य आणि सहयोगाद्वारे, अंमली पदार्थ विरोधी एक देशव्यापी अभेद्य यंत्रणा उभारण्यात आली आहे.  या रणनीतीमुळे अंमली पदार्थांची जप्ती आणि गुन्ह्यांची नोंद, यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

शाह म्हणाले की, “#DrugsfreeBharat (अंमली पदार्थ मुक्त भारत) ही मोहीम, आपल्या भावी पिढीसाठी सर्वात मोठी भेट आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली, अंमली पदार्थांचा शोध घेणे, अंमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करणे आणि व्यसनाधीनांचे पुनर्वसन करत गुन्हेगारांना अटक करणे याद्वारे आपला देश हे लक्ष्य वेगाने साध्य करत आहे.

अंमली पदार्थांच्या अवैध कारभाराला लगाम घालण्यासाठी मोदी सरकारने केलेल्या बहुआयामी प्रयत्नांमुळे, जप्त केलेल्या अंमली पदार्थांचे प्रमाण जवळपास 100% नी वाढले आहे आणि या प्रकरणांतील गुन्हेगारांवर नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये 152% नी वाढ झाली आहे.

मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2006 ते 2013 या कालावधीत 1257 गुन्ह्यांची नोंद झाली असून ही संख्या 2014-2023 या कालावधीत तिपटीने वाढून 3755 वर पोहोचली आहे. 2006-13 या कालावधी मधील अटक झालेल्यांच्या 1363 च्या तुलनेत,2014-23 या कालावधीमध्ये अटकेच्या प्रमाणात चौपट वाढ होऊन ही संख्या 5745 पर्यंत पोहोचली आहे.  2006-13 या कालावधीत जप्त केलेल्या 1.52 लाख किलो अंमली पदार्थांच्या तुलनेत मोदी सरकारच्या काळात जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचे प्रमाण दुपटीने वाढून  3.95 लाख किलो इतके झाले आहे.मोदी सरकारच्या काळात जप्त केलेल्या अंमली पदार्थांचे मूल्य 2006-13 या कालावधीतील 768 कोटी रुपयांच्या तुलनेत 30 पटीने वाढून 22,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

अंमली पदार्थ विरोधी यंत्रणांनी मोदी सरकारच्या काळात 12 हजार कोटी रुपयांचे 12 लाख किलो अंमली पदार्थ नष्ट केले.  जून 2023 पर्यंत, अंमली पदार्थ नियंत्रण विभाग-NCB ने अशा 23 प्रकरणांमध्ये आर्थिक तपास करुन, 74,75,00,531 रुपये किमतीची मालमत्ता गोठवली आहे.

***

N.Chitale/A.Save/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2011120) Visitor Counter : 79