अर्थ मंत्रालय
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या नवी दिल्लीत राज्य तसेच केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अंमलबजावणी प्रमुखांच्या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे करणार उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
03 MAR 2024 2:48PM by PIB Mumbai
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) अंमलबजावणी यंत्रणा बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या महसूल विभागाने सोमवार, 4 मार्च 2024 रोजी नवी दिल्लीत, सर्व राज्ये तसेच केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अंमलबजावणी प्रमुखांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे.
केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या एकदिवसीय परिषदेचे उद्घाटन होणार असून त्या बीज भाषणही देतील. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी हे देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
वस्तू आणि सेवा कर चुकवेगिरीला आणि बनावट पावत्यांना आळा घालणे, सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे, समन्वय वाढवणे, तंत्रज्ञान आणि डेटा यांची सांगड घालणे, व्यवसाय सुलभीकरण आणि प्रभावी प्रतिबंधात्मक अंमलबजावणी उपाय यांचा सुवर्णमध्य गाठणे या मुद्य्यांवर या परिषदेत सांगोपांग चर्चा अपेक्षित आहे.
***
N.Chitale/S,Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2011095)
आगंतुक पटल : 141