पंतप्रधान कार्यालय
उत्तर प्रदेशातील कासगंज येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांना शोक
Posted On:
24 FEB 2024 8:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2024
उत्तर प्रदेशातील कासगंज येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले की,
"हृदयद्रावक! उत्तर प्रदेशातील कासगंज येथे ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पडल्याने घडलेला अपघात दुःखद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल माझ्या सहवेदना. त्याचबरोबर जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली, स्थानिक प्रशासन अपघातग्रस्तांना शक्य ती सर्व मदत पुरवत आहे.”
* * *
M.Pange/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2008705)
Visitor Counter : 82
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam