आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू एम्सचे उद्‌घाटन


गेल्या 10 वर्षांत जम्मू-काश्मीरमधील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 4 वरून 12 झाली, तर एमबीबीएसच्या जागा 500 वरून 1300 झाल्या : पंतप्रधान

"गेल्या 10 वर्षात जम्मू-काश्मीरमध्ये वैद्यकीय पदव्युत्तर पदवीच्या जागा 0 वरून 650 झाल्या "

"एम्स जम्मूच्या कार्यान्वित झाल्यामुळे जम्मूच्या लोकांना यापुढे विशेष वैद्यकीय उपचारांचा लाभ घेण्यासाठी दिल्लीला जावे लागणार नाही"

2047 पर्यंत विकसित भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार, यासाठी विकसित जम्मू आणि काश्मीरचे महत्त्व पंतप्रधानांनी केले अधोरेखित

पायाभरणीनंतर अवघ्‍या पाच वर्षात एम्स जम्मूची उभारणी पूर्ण, यावरून या क्षेत्राविषयी केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचे दर्शन : केंद्रीय आरोग्य मंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एम्स, आयआयटी, आयआयएम आणि इतर नामांकित संस्था असलेला जम्मू आणि काश्मीर हा भारतातील एकमेव प्रदेश: नायब राज्यपाल

Posted On: 20 FEB 2024 8:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 20 फेब्रुवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी प्रदेशातील इतर विविध विकास कामांचे उद्‌घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली आणि केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

या कार्यक्रमाला प्रदेशाचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचे मंत्री डॉ जितेंद्र सिंह आणि जम्मूचे खासदार जुगल किशोर शर्मा उपस्थित होते.

यावेळी मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, “गेल्या 10 वर्षांत जम्मू आणि काश्मीरमधील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 4 वरून 12 पर्यंत वाढली आहे. त्याचप्रमाणे, त्याच कालावधीत, जम्मू आणि काश्मीरमधील एमबीबीएसच्या जागा 500 वरून 1300  झाल्या आहेत.” 2014 पूर्वी या प्रदेशामध्ये वैद्यकीय जागा नव्हत्या, यावर प्रकाश टाकून ते म्हणाले की, आज या केंद्रशासित प्रदेशात वैद्यकीय पदव्युत्तर पदवीच्या 650 जागा आहेत". या प्रदेशात 35 नवीन नर्सिंग आणि पॅरामेडिकल  महाविद्यालये देखील उदयास येत आहेत ज्यामुळे नर्सिंगच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होईल, असे त्यांनी पुढे सांगितले.

जम्मू एम्स चे उद्‌घाटन करताना पंतप्रधान म्हणाले, "केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षात 15 नवीन एम्स  जोडले आहेत, त्यापैकी  दोन एकट्या जम्मू आणि काश्‍मीर मध्ये आहेत." ते म्हणाले की, "एम्स जम्मू कार्यान्वित झाल्यानंतर, जम्मूच्या लोकांना यापुढे विशेष वैद्यकीय उपचारांचा लाभ घेण्यासाठी दिल्लीला जावे लागणार नाही, ज्यामुळे त्यांचा मौल्यवान वेळ आणि संसाधने वाचण्यास मदत होईल."

देशातील सर्व क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या परिवर्तनाच्या वेगवान गतीवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. 2047 पर्यंत विकसित भारत होण्याच्या भारताच्या व्हिजनचा त्यांनी पुनरुच्चार केला आणि लोकांना त्या व्हिजनसाठी काम करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की,  विकसित जम्मू आणि काश्मीर होणे ही,  विकसित भारतासाठी पूर्व-आवश्यकता आहे आणि जम्मू आणि काश्मीरमधील केंद्र सरकारच्या विविध विकासात्मक आणि उत्थान प्रकल्पांचे उद्दिष्ट ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आहे.

या प्रसंगी आनंद व्यक्त करताना, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी एम्स जम्मूसाठी केंद्र सरकारच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला. पायाभरणीनंतर  केवळ 5 वर्षामध्‍ये या एम्सची उभारणी पूर्ण झाली, हे मांडविया यांनी नमूद केले.

पार्श्‍वभूमी - एम्स जम्मू

जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना सर्वसमावेशक, दर्जेदार आणि सर्वसमावेशक क्षेत्रीय काळजी आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या एक पाऊल म्हणून पंतप्रधानांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), जम्मूमधील विजयपूर (सांबा) येथील, इस्पितळाचे उद्‌घाटन केले. या संस्थेची पायाभरणीही पंतप्रधानांनी फेब्रुवारी 2019 मध्ये केली होती. ही संस्था केंद्रीय क्षेत्रातील प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत स्थापन केली जात आहे.

 

S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2007538) Visitor Counter : 67