गृह मंत्रालय

कोणत्याही आपत्तीचा सामना करू शकणारा आणि कोणत्याही आपत्ती काळात टिकाव धरू शकणारा भारत घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुआयामी आपत्ती व्यवस्थापन आराखडा आणला - केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन

Posted On: 19 FEB 2024 9:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 फेब्रुवारी 2024

 

कोणत्याही आपत्तीचा सामना करू शकणारा आणि कोणत्याही आपत्ती काळात टिकाव धरू शकणारा भारत घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुआयामी आपत्ती व्यवस्थापन आराखडा आणला असल्याचे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह  यांनी म्हटले आहे. 

यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांनी 'एक्स' या समाजमाध्यमावर आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित  माहितीपर संदेशांची मालिका लिहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुआयामी आपत्ती व्यवस्थापन आराखडा आणला. या आराखड्याअंतर्गत, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने शीघ्र प्रतिसाद दलाची स्थापना केली, तसेच आपत्तींविषयी सतर्कतने पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित केली. यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचू शकले आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांनी म्हटले आहे.

कोणत्याही आपत्तीचा सामना करू शकणारा आणि कोणत्याही आपत्ती काळात टिकाव धरू शकणारा भारत घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करताना  शून्य मृत्य असा दृष्टिकोन अवलंबला. सद्यस्तितीतली आपली आपत्ती प्रतिसाद पथके प्रत्येक व्यक्तीचा जीव सुरक्षित करण्याच्या ध्येयाने प्रेरित आहेत,  आणि ते पूर्णतः एक पेशेवर  दल या दृष्टीकोनातूनच कार्यरत आहेत असे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह  यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाच्या बळावर आज आपला भारत कोणत्याही आपत्कालीन परिस्थिती सामना करण्यासाठी सज्ज आहे असे शाह  यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने, आपत्कालीन परिस्थितींचा सामना करताना  शून्य मृत्य असा दृष्टिकोन अवलंबल्याने बिपरजॉय चक्रीवादळाची विध्वंसक ताकदही आपल्या नागरिकांपैकी कोणाचाही जीव हिरावून घेऊ शकली नाही असे शाह  यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही आपत्तीचा सामना करू शकणारा आणि कोणत्याही आपत्ती काळात टिकाव धरू शकणाऱ्या राष्ट्र निर्मितीच्या कार्यात देशाच्या युवा शक्तीचा उपयोग करून घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारने लाखो लोकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले, यामुळे आपल्या आपत्ती प्रतिसाद दलाचे मनोधैर्य वाढले आणि आपला समाजही कोणत्याही आपत्तींचा सामना करण्यासाठी सक्षम झाला असे शाह  यांनी आपल्या एक्स संदेशांमध्ये म्हटले आहे.

गृह मंत्रालयाने 8000 कोटी रुपयांची आपत्ती व्यवस्थापन योजना लागू केली आहे, या योजनेअंतर्गत राज्याराज्यांमध्ये अग्निशमन सेवेचा विस्तार करण्यात आला, यामुळे सात प्रमुख शहरांमध्ये पूरापासून होणाऱ्या नुकसानीचा आणि 17 राज्यांमध्ये भूस्खलनामुळे होणाऱ्या नुकसानीचा धोका कमी झाला  आहे. असे शाह  यांनी म्हटले आहे. यासोबतच अग्निशमन सेवेचा विस्तार आणि आधुनिकीकरणासाठी जून 2023 मध्ये पाच हजार कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

वर्ष 2021 मध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीअंतर्गत 'राज्य आपत्ती निवारण निधी' अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासाठी 13,693 कोटी रुपये, तर राज्य आपत्ती प्रतिसाद दलासाठी 32,031 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती शाह  यांनी दिली आहे. 2005-2014 च्या तुलनेत 2014-2023 मध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासासाठीचा निधी तिप्पटीने वावढला असल्याची बाबही शाह  यांनी आपल्या संदेशात नमूद केली आहे. 

350 आपत्तीप्रवण जिल्ह्यांमध्ये 369 कोटी रुपयांची तरतूद असलेल्या आपदा मित्र योजनेचा उद्देश  1,00,000 युवा स्वयंसेवकांना प्रशिक्षित करणे, हा आहे.  . या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 83,000 पेक्षा जास्त युवा स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले असून, आपत्तींना सामोरे जाण्याच्या जोखमीच्या अनुषंगाने या स्वयंसेवकांच्या जीवन विम्याची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती शाह  यांनी आपल्या संदेशातून दिली आहे.

 

 

 

 

* * *

S.Kakade/T.Pawar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2007246) Visitor Counter : 44