संसदीय कामकाज मंत्रालय
केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते उद्या होणार 16 व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा 2019-20 चे पारितोषिक वितरण
महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठाचा गट स्तरावर अव्वल स्थान पटकावणाऱ्या पाच संस्थांमध्ये समावेश
Posted On:
15 FEB 2024 12:02PM by PIB Mumbai
विद्यापीठे/महाविद्यालये यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 16 व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा 2019-20 चे उद्या नवी दिल्लीत पारितोषिक वितरण होणार आहे, जीएमसी बालयोगी ऑडिटोरियम, पार्लमेंट लायब्ररी बिल्डींग, पार्लमेंट हाऊस कॉम्प्लेक्स येथे हा कार्यक्रम होणार आहे.
केंद्रीय विधि आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), संसदीय व्यवहार राज्यमंत्री आणि संस्कृती राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील आणि या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पारितोषिके मिळवणारे विद्यार्थी आणि संस्था यांना पारितोषिके देऊन सन्मानित करतील. 16 व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवणारे भंटिडा येथील पंजाबच्या केंद्रीय विद्यापीठाचे विद्यार्थी यावेळी त्यांच्या युवा संसद बैठकीचे पुन्हा सादरीकरण करतील.
संसदीय व्यवहार मंत्रालय गेल्या 27 वर्षांपासून विद्यापीठे/महाविद्यालये यांच्यासाठी युवा संसद स्पर्धेचे आयोजन करत आहे. विद्यापीठे/महाविद्यालये यांच्यासाठी युवा संसद स्पर्धा योजनेअंतर्गत या मालिकेतील 16 व्या स्पर्धेचे देशातील 36 विद्यापीठे/महाविद्यालयांमध्ये आयोजन करण्यात आले.
युवा पिढीमध्ये स्वयंशिस्त, भिन्न विचारांविषयी सहिष्णुता, न्याय्य अभिव्यक्तीची आणि लोकशाही जीवनाचे इतर पैलू यांविषयी जागरुकता निर्माण करणे हा युवा संसद योजनेचा उद्देश आहे. त्याशिवाय या योजनेमुळे विद्यार्थ्यांना संसदीय कामकाजाच्या प्रक्रिया आणि पद्धती, विविध विषयांवरील चर्चा, संवादात्मक वाद-विवाद यांची माहिती मिळते आणि त्यांच्यात आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि प्रभावी वक्तृत्व कौशल्य निर्माण होते.
भटिंडा येथील पंजाबच्या केंद्रीय विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल फिरती ढाल आणि ट्रॉफी देण्यात येईल. तर गट स्तरावरील विजेत्यांना देखील मंत्रालयाकडून ट्रॉफी दिल्या जातील. खालील पाच विद्यापीठे/महाविद्यालयांनी गट स्तरावरील स्पर्धेत अव्वल स्थान मिळवले आहे-
अनुक्रमांक
|
विद्यापीठ/महाविद्यालयाचे नाव
|
1
|
डीएव्ही महाविद्यालय, जालंधर
|
2
|
जादवपूर विद्यापीठ, कोलकाता
|
3
|
मुंबई विद्यापीठ, मुंबई
|
4
|
चाणक्य राष्ट्रीय विधि विद्यापीठ, पाटणा
|
5
|
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
|
***
S.Tupe/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2006243)
Visitor Counter : 124