राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान गुजरात आणि राजस्थानच्या दौऱ्यावर

Posted On: 11 FEB 2024 8:26PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 12 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत गुजरात आणि राजस्थानच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

12 फेब्रुवारी रोजी, गुजरातमधील टंकारा येथे महर्षी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 200 व्या जन्मोत्सव - ज्ञान ज्योती पर्व स्मरणोत्सव समारंभात राष्ट्रपती सहभागी होतील. त्याच दिवशी, राष्ट्रपती सुरत येथील सरदार वल्लभभाई राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या 20 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करतील.

13 फेब्रुवारी रोजी, राष्ट्रपती वलसाड, धरमपूर येथील श्रीमद राजचंद्र मिशनला भेट देतील. यावेळी राष्ट्रपती धरमपूर येथे गुजरातमधील विशेष दुर्लक्षित आदिवासी गटातल्या (PVTG)  सदस्यांशी संवाद साधतील.

14 फेब्रुवारी रोजी, राष्ट्रपती राजस्थानमधील बेनेश्वर धाम येथे विविध  स्वयंसहायता बचत गटांशी संबंधित आदिवासी महिलांच्या मेळाव्याला संबोधित करतील.

***

N.Chitale/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2005124) Visitor Counter : 100