पंतप्रधान कार्यालय
श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये यूपीआय सेवांच्या उद्घाटन समारंभाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ उपस्थित राहणार
मॉरिशसमध्ये रुपे कार्ड ही सुरू होणार
यामुळे लोकांमधले परस्पर संबंध अधिक दृढ होऊन पर्यटनाला चालना मिळणार
प्रविष्टि तिथि:
11 FEB 2024 3:13PM by PIB Mumbai
श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये युनीफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) या आर्थिक व्यवहारांच्या डिजिटल सेवांच्या, तसेच मॉरिशसमध्ये रुपे कार्डच्या उद्घाटन समारंभाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ, दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम उद्या 12 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी एक वाजता होणार आहे.
अर्थतंत्रज्ञानातील नवकल्पना (फिनटेक इनोव्हेशन) आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये (डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर) भारत आघाडीवर आहे. भागीदार देशांना भारताचे विकासाबाबतचे अनुभव आणि नवकल्पना माहीत करुन द्याव्यात, यावर पंतप्रधानांनी जोरदार भर दिला आहे. श्रीलंका आणि मॉरिशस यांच्याशी भारताचे असलेले दृढ सांस्कृतिक आणि लोकांमधील परस्पर संबंध लक्षात घेता, या उपक्रमाद्वारे वेगवान आणि सातत्यपूर्ण डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून, तसेच देशांमधील परस्पर डिजिटल संपर्कव्यवस्था वाढवल्यामुळे, सर्व स्तरातील लोकांना मोठा फायदा होणार आहे.
या उपक्रमामुळे श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी तसेच भारतात प्रवास करणाऱ्या मॉरिशसच्या नागरिकांसाठी यूपीआयच्या माध्यमातून विक्रेता-ग्राहक आर्थिक व्यवहार (सेटलमेंट) सेवा उपलब्ध होणार आहे. मॉरिशसमध्ये होत असलेल्या रुपे कार्ड सेवांच्या विस्तारामुळे, मॉरिशसमध्ये रुपे यंत्रणेवर आधारीत कार्ड जारी करणे मॉरिशसच्या बँकांना शक्य होईल आणि भारत तसेच मॉरिशस या दोन्ही देशांमध्ये सेटलमेंटसाठी, रुपे कार्ड सहजपणे वापरता येईल.
***
N.Chitale/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2005010)
आगंतुक पटल : 150
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam