गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांचा आज लोकसभेत ऐतिहासिक राम मंदिराची उभारणी आणि श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेविषयी नियम 193 अंतर्गत झालेल्या चर्चेत सहभाग
22 जानेवारी 2024 हा दिवस 10,000 वर्षांसाठी एक ऐतिहासिक दिवस असेल
22 जानेवारी हा दिवस प्रभू श्री रामाच्या कोट्यवधी भाविकांच्या आकांक्षा आणि संकल्पांच्या पूर्ततेचा दिवस आहे, भारताच्या आध्यात्मिक चेतनेच्या पुनरुत्थानाचा आणि महान भारताच्या प्रवासाच्या प्रारंभाचा हा दिवस आहे.
Posted On:
10 FEB 2024 6:09PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह आज लोकसभेत ऐतिहासिक राम मंदिराची उभारणी आणि श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेविषयी नियम 193 अंतर्गत झालेल्या चर्चेत सहभागी झाले. आपल्या हृदयातील भावना आणि अनेक वर्षे न्यायालयाच्या कागदपत्रांमध्ये दबून राहिलेला आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर व्यक्त होण्यास वाव मिळालेला जनतेचा आवाज सभागृहात मांडण्याची आपल्याला इच्छा आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. 22 जानेवारी 2024 हा दिवस दहा हजार वर्षांसाठी ऐतिहासिक दिवस असेल, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की प्रभू राम आणि राम चरित्राशिवाय भारताची कल्पना करता येणार नाही आणि ज्यांना हा देश जाणून घ्यायचा आहे, अनुभवायचा आहे आणि माहीत करून घ्यायचा आहे ते प्रभू राम आणि रामचरित मानसशिवाय करू शकत नाहीत.
भारतीय संस्कृती आणि रामायण यांना स्वतंत्रपणे पाहता येणार नाही. अनेक भाषा, प्रदेश आणि धर्मांमध्ये रामायणाचा उल्लेख आहे, भाषांतर करण्यात आले आहे आणि त्याच्या परंपरा आणि कार्य यामुळे राष्ट्रीय चेतनेचा ते आधार बनले आहे. अनेक देशांनी रामायणाचा स्वीकार केला आहे आणि त्याला आदर्श महानाट्य म्हणून मान्यता दिली आहे. 22 जानेवारी रोजी देशाच्या इच्छांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पूर्तता झाली. शाह म्हणाले की ही कायदेशीर लढाई 1858 पासून सुरु होती आणि 330 वर्षांनी ती संपली. आज रामलल्ला त्यांच्या घरी विराजमान आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या वेळी आणि राम मंदिराच्या उभारणीच्या वेळी अनेक लोक म्हणाले की देशात हिंसा होईल, पण नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.
मोदीजींच्या दूरदर्शी विचारसरणीमुळे न्यायालयाच्या निकालाचे कोणताही विजय किंवा पराभवाऐवजी त्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात रुपांतर झाले.
अमित शाह म्हणाले की गेल्या 10 वर्षात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाचे परिणाम साध्य झाले आहेत. यापूर्वी देशात धोरण दुर्बलता असलेले सरकार होते आणि आज अनेक धोरणे तयार करून मोदीजींनी भारताच्या अर्थव्यवस्थेला जगात 11 व्या स्थानावरून 5व्या स्थानावर नेले.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की या देशाला प्रदीर्घ काळापासून अशाच नेतृत्वाची गरज होती. देशातील 140 कोटी जनतेने नरेंद्र मोदी यांना निवडून देत देशासमोरच्या सर्व आव्हानांचा शेवट केला. राम मंदिराची उभारणी म्हणजे संपूर्ण समाजाला एकत्र जोडून सामाजिक एकता आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाचे अद्भुत उदाहरण आहे, असे ते म्हणाले. शाह म्हणाले की अयोध्येत उभारण्यात आलेले राम मंदिर हे विध्वंसावरील विकासाचा आणि धार्मिक कट्टरतेवरील आध्यात्मिकता आणि भक्तीभावाचा विजय आहे.
***
N.Chitale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2004908)
Visitor Counter : 86