गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल केला आनंद व्यक्त

Posted On: 09 FEB 2024 6:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 फेब्रुवारी 2024

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

X वरील  पोस्ट मध्ये अमित शाह यांनी चौधरी चरण सिंह यांचा सन्मान करून देशातील कोट्यवधी  शेतकरी आणि कष्टकरी जनतेचा सन्मान केल्याबद्दल  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी जीवन वाहून घेतलेल्या चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कामे केली असे ते म्हणाले. चौधरी साहेब आयुष्यभर लोकशाही मूल्ये जपण्यासाठी समर्पित राहिले आणि त्यांनी आणीबाणीचा धैर्याने सामना केला, असे शाह म्हणाले.   चौधरी चरण सिंह  यांनी आपल्या निर्णयांद्वारे संपूर्ण देशाला दाखवून दिले की,  शेतकऱ्याचा मुलगा देशाच्या उदरनिर्वाहापासून ते धोरणात्मक प्रश्नांपर्यंतचे निर्णय देखील घेऊ शकतो असे ते पुढे म्हणाले.

 

* * *

S.Bedekar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2004609) Visitor Counter : 40