सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ओबीसी दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या राहुल गांधी यांनी जाहीर सभेमध्ये केलेल्या वक्तव्याला उत्तर देणारे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे निवेदन
प्रविष्टि तिथि:
09 FEB 2024 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2024
एका जाहीर सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ओबीसी दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे विधान केले होते.
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने याद्वारे हे स्पष्ट केले आहे की, मोध घांची जात 91 (अ) च्या मंडल यादीत आहे. गुजरात सरकारने 25 जुलै 1994 रोजी मोध घांची जातीला ओ. बी. सी. च्या राज्य यादीत समाविष्ट करण्यासाठी अधिसूचना जारी केली होती.
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने गुजरात राज्याच्या ओ. बी. सी. च्या केंद्रीय यादीत मोध-घांचीचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारला 15.11.1997 रोजी सल्ला दिला होता आणि त्यासाठी 27.10.1999 रोजी राजपत्र अधिसूचना जारी करण्यात आली. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कायदा, 1993 नुसार, कोणत्याही जातीचा/समुदायाचा ओ. बी. सी. च्या केंद्रीय यादीत समावेश करण्याचा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा सल्ला सामान्यतः केंद्र सरकारला बंधनकारक होता. गुजरात राज्याच्या ओ. बी. सी. च्या केंद्रीय यादीत मोध घांची जातीसह 104 जाती/समुदाय आहेत.
हे लक्षात घेतले पाहिजे की, ज्यावेळी मोध-घांचीचा ओ. बी. सी. च्या राज्य यादीत तसेच ओ. बी. सी. च्या केंद्रीय यादीत समावेश करण्यासाठी वरील दोन्ही निर्णय घेण्यात आले, त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्याकडे कोणतेही विधिमंडळ किंवा कार्यकारी पद नव्हते.
* * *
S.Bedekar/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2004588)
आगंतुक पटल : 123