राष्ट्रपती कार्यालय
अरुण जेटली राष्ट्रीय आर्थिक व्यवस्थापन संस्थेच्या 31 व्या परिविक्षाधीन तुकडीच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींनी घेतली राष्ट्रपतींची भेट
Posted On:
05 FEB 2024 3:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 5 फेब्रुवारी 2024
अरुण जेटली राष्ट्रीय आर्थिक व्यवस्थापन संस्थेच्या परिविक्षाधीन प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या 31 व्या तुकडीच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आज (5 फेब्रुवारी, 2024) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. हे अधिकारी भारतीय नागरी लेखा सेवा, भारतीय संरक्षण लेखा सेवा आणि भारतीय कर्मचारी आणि प्रशिक्षण (वित्त आणि लेखा) सेवेतील आहेत.
उत्तम सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली हा सुशासनाचा आधार आहे हे सर्वज्ञात वास्तव आहे, असे राष्ट्रपतींनी अधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले.
सरकारचे कार्य कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी सहाय्यकारी ठरणारी आर्थिक व्यवस्थापन प्रणाली तयार करणे आणि ती सुस्थितीत सुरू ठेवण्याची जबाबदारी संघटित वित्तीय सेवांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची आहे, असे त्या म्हणाल्या.आपल्या क्षमता आत्मसात करून आणि त्याचा उपयोग करून ही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन राष्ट्रपतींनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना केले.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
S.Tupe/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2002581)
Visitor Counter : 91