अर्थ मंत्रालय
2023-24 या आर्थिक वर्षासाठी डिसेंबर 2023 पर्यंतच्या भारत सरकारच्या खात्यांचा मासिक आढावा
Posted On:
31 JAN 2024 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जानेवारी 2024
भारत सरकारच्या डिसेंबर 2023 पर्यंतच्या मासिक खाते एकत्रित करून अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. अहवालातील ठळक मुद्दे पुढील प्रमाणे आहेत:-
भारत सरकारला डिसेंबर 2023 पर्यंत 20,71,939 कोटी रुपये (एकूण प्राप्तीच्या संबंधित BE 2023-24 च्या 76.3%) प्राप्त झाले आहेत, ज्यात 17,29,931 कोटी रुपयांचा कर महसूल (निव्वळ केंद्राकडे), 3,12,358 कोटी रुपये करेतर महसूल आणि 29,650 कोटी रुपये बिगर कर्ज भांडवली प्राप्ती यांचा समावेश आहे. बिगर कर्ज भांडवली प्राप्तीमध्ये 19,597 कोटी रुपयांची कर्जाची वसुली आणि 10,053 कोटी रुपयांच्या विविध भांडवली प्राप्तींचा समावेश आहे. या कालावधीपर्यंत भारत सरकारकडून 7,47,288 कोटी रुपये राज्य सरकारांना कराच्या वाट्याच्या रुपात हस्तांतरित करण्यात आले आहेत, जे मागील वर्षाच्या तुलनेत 1,37,851 कोटी रुपये अधिक आहेत.
भारत सरकारने केलेला एकूण खर्च 30,54,217 कोटी रुपये आहे (2023-24 च्या संबंधित BE च्या 67.8%), त्यापैकी 23,80,587 कोटी रुपये महसूल खात्यावर आणि 6,73,630 कोटी रुपये भांडवली खात्यावर जमा आहेत. एकूण महसुली खर्चापैकी, 7,48,207 कोटी रुपये हे व्याज देयकांच्या खात्यावर आणि 2,76,804 कोटी रुपये मुख्य अनुदानाच्या खात्यावर आहेत.
* * *
R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2000963)
Visitor Counter : 180