गृह मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद हा परीक्षेदरम्यान आपल्या युवा पिढीला भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एक अभ्यासपूर्ण धडा होता- केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह
मोदीजींचे शब्द त्यांना त्यांच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी केवळ प्रोत्साहित करणारे नव्हते तर तणावाचा सामना करण्यासाठी देखील उपयुक्त होते
आपल्या भावी पिढ्यांना चांगले शिकवण्यासाठी आणि त्यांना उत्तम प्रकारे घडवण्यासाठी शिक्षक आणि पालकांसाठी ते मार्गदर्शक ठरतील
Posted On:
29 JAN 2024 8:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जानेवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद हा परीक्षेदरम्यान आपल्या युवा पिढीला भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एक अभ्यासपूर्ण धडा होता असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.
X प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद हा परीक्षेदरम्यान आपल्या युवा पिढीला भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एक अभ्यासपूर्ण धडा होता.
मोदीजींचे शब्द त्यांना त्यांच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी केवळ प्रोत्साहित करणारे नव्हते तर तणावाचा सामना करण्यासाठी देखील उपयुक्त होते. आपल्या भावी पिढ्यांना चांगले शिकवण्यासाठी आणि त्यांना उत्तम प्रकारे घडवण्यासाठी शिक्षक आणि पालकांसाठी ते मार्गदर्शक ठरतील.”
* * *
R.Aghor/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2000452)
Visitor Counter : 96