केंद्रीय लोकसेवा आयोग
भारतीय आर्थिक सेवा (आयईएस) / भारतीय सांख्यिकी सेवा (आयएसएस) परीक्षा- 2023 चा अंतिम निकाल
Posted On:
25 JAN 2024 3:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2024
केंद्रीय लोकसेवा आयोगाने 23 ते 25 जून 2023 या कालावधीत घेतलेल्या भारतीय आर्थिक सेवा / भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा, 2023 च्या लेखी परीक्षेच्या निकालांवर आधारित, व्यक्तिमत्व चाचणीसाठी 18 ते 21 डिसेंबर 2023 या कालावधीत मुलाखती घेतल्यानंतर, भारतीय आर्थिक सेवा आणि भारतीय सांख्यिकी सेवे मधील पदांवर नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेच्या क्रमाने खालील याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
शासनाने नोंदवलेल्या रिक्त पदांवर भरल्या जाणार्या पदांसाठी संख्या खालीलप्रमाणे आहे:
Service
|
GEN
|
EWS
|
OBC
|
SC
|
ST
|
Total
|
Indian Economic Service
|
07
|
03
|
05
|
03
|
00
|
18
[Inc.01 PwBD-1]
|
Indian Statistical Service
|
14
|
04
|
10
|
05
|
02
|
35
[Inc. 01
PwBD-4&5]
|
भारतीय आर्थिक सेवा आणि भारतीय सांख्यिकी सेवेमधील पदांवर नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची संख्या खालीलप्रमाणे आहे:
Service
|
GEN
|
EWS
|
OBC
|
SC
|
ST
|
Total
|
Indian Economic Service
|
07
[Inc.01 PwBD-1]
|
03
|
05
|
03
|
00
|
18
[Inc.1 PwBD-1]
|
Indian Statistical Service
|
07
|
06
|
13
|
05
|
02
|
33*
|
*पीडब्लूबीडी -4 आणि 5 उमेदवारांच्या अनुपलब्धतेमुळे, 15.01.2018 च्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या कार्यालयीन निवेदन Estt.(Res) 36035/2/2017- (Res) नुसार सामान्य श्रेणीची 01 जागा रिक्त ठेवण्यात आली आहे.
सध्याच्या नियमांनुसार आणि उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार नियुक्त्या काटेकोरपणे केल्या जातील.
शिफारस केलेल्या उमेदवारांच्या खालील अणुक्रमांकाचे निकाल तात्पुरते आहेत:
भारतीय आर्थिक सेवा (03)
भारतीय सांख्यिकी सेवा (04)
0670085
|
0871179
|
2670013
|
2670214
|
भारतीय सांख्यिकी सेवा (आयएसएस ) परीक्षा, 2023 च्या बाबतीत तीन उमेदवारांचा निकाल सीलबंद लिफाफ्यात ठेवण्यात आला आहे:-
- माननीय केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकणाचे प्रधान खंडपीठ, नवी दिल्ली यांच्यासमोर प्रलंबित न्यायालयीन प्रकरण कार्यालयीन आदेश क्रमांक 4161/2023 च्या निकालाच्या अधीन 01 उमेदवाराचा निकाल सीलबंद लिफाफ्यात ठेवण्यात आला आहे.
- 01 उमेदवाराचा निकाल सीलबंद लिफाफ्यामध्ये ठेवण्यात आला आहे आणि अंतिम शिफारस केलेल्या ईडब्लूएस उमेदवाराची उमेदवारी माननीय केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकणाचे प्रधान खंडपीठ, नवी दिल्ली यांच्यासमोर प्रलंबित न्यायालयीन प्रकरण कार्यालयीन आदेश क्रमांक 4113/2023 च्या निकालाच्या अधीन आहे.
- 01 उमेदवाराचा निकाल सीलबंद लिफाफ्यामध्ये ठेवण्यात आला आहे आणि शिफारस केलेल्या ओबीसी उमेदवाराचा निकाल माननीय केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकणाचे प्रधान खंडपीठ, नवी दिल्ली यांच्यासमोर प्रलंबित न्यायालयीन प्रकरण कार्यालयीन आदेश क्रमांक OA क्रमांक 4174/2023 च्या निकालाच्या अधीन आहे.
ज्या उमेदवारांचा निकाल तात्पुरता प्रलंबित ठेवण्यात आला आहे अशा उमेदवारांची नियुक्ती अशा उमेदवारांकडून प्रलंबीत असलेल्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करेपर्यंत आणि या उमेदवारांची तात्पुरती स्थिती स्पष्ट करेपर्यंत आयोग जारी करणार नाही. या उमेदवारांच्या तात्पुरत्या निकालाची मुदत अंतिम निकाल जाहीर झाल्यापासून तीन महिन्यांच्या कालावधीसाठीच वैध राहील.. या कालावधीत आयोगाला आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करण्यात उमेदवार अपयशी ठरल्यास, त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल आणि या संदर्भात पुढील कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
यूपीएससीच्या परिसरामध्ये परीक्षा सभागृहाजवळ एक 'सुविधा कक्ष ' आहे. उमेदवार त्यांच्या परीक्षा/भर्ती बाबत कोणतीही माहिती/स्पष्टीकरण कार्यालयीन दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेदरम्यान वैयक्तिकरित्या किंवा दूरध्वनी क्र. 011-23385271 / 23381125 द्वारे मिळवू शकतात. निकाल युपीएससीच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध असेल . उमेदवारांचे गुण निकाल जाहीर झाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील.
आयएफएसच्या अंतिम निकालासाठी येथे क्लिक करा.
आयएसएसच्या अंतिम निकालासाठी येथे क्लिक करा.
* * *
NM/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1999531)
Visitor Counter : 115