माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एक भारत, श्रेष्ठ भारत संकल्पनेचे उदाहरण बनली अयोध्या

Posted On: 21 JAN 2024 3:00PM by PIB Mumbai

 

काश्मीरमधल्या बर्फाच्छादीत शिखरांपासून ते उन्हात न्हाऊन निघालेल्या कन्याकुमारीतील समुद्रकिनाऱ्यांपर्यंतरामनामाच्या जयघोषाने  भारतभर भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. आता अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिराच्या स्वरूपात ही भक्ती मूर्त रूप धारण करत आहे.  हे भव्य मंदिर केवळ भव्यतेच्या बाबतीतच नव्हे तर देश-विदेशातून  आलेल्या योगदानाच्या माध्यमातूनही भारताच्या एकता आणि भक्तीचे प्रतीक म्हणून खंबीरपणे उभे आहे.

Image

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक भारत श्रेष्ठ भारतसंकल्पना  या मंदिरासमवेत प्रतिध्वनीत होत आहे.मंदिराच्या तीर्थयात्रेत राष्ट्राला एकत्र आणत कोणत्याही सीमेपलीकडे जात  एक अतूट विश्वास आणि उदारतेचा हे मंदिर  दाखला देते.

मंदिराचा गाभारा राजस्थानच्या मकराना संगमरवराच्या मूळ पांढर्‍या नजाकतीने सुशोभित आहे.  कर्नाटकातील चर्मोथी वाळूच्या दगडानेदेवतांच्या मूर्ती घडवल्या आहेत.  तर राजस्थानातील बन्सी पहाडपूर येथील गुलाबी वाळूचा दगड प्रवेशद्वारावरील आकृतीमध्ये वापरण्यात आला आहे.

संपूर्ण देशाचे हे योगदान केवळ बांधकाम साहित्यापुरते मर्यादीत नाही, तर त्याही पलीकडे आहे.  गुजरातचा दानशूरपणा ध्वनित करत गुजरातमधून आलेली एक भव्य 2100 किलो वजनाची अष्टधातुची घंटा, मंदिराच्या भव्य दालनात वातावरण नादमय करेल. या दैवी घंटेसोबतचअखिल भारतीय दरबार समाजाने तयार केलेला नगारा नेणारा  700 किलो वजनाचा रथ देखील, गुजरातने दिला आहे.  प्रभू रामाच्या मूर्तीसाठी वापरण्यात आलेला काळा  पाषाण  कर्नाटकातील आहे.  हिमालयाच्या पायथ्यापासून ते अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा या भागांमधून, या तिर्थक्षेत्राचे प्रवेशद्वार म्हणून उभे असलेले नाजूक कोरीवकाम केलेले लाकडी दरवाजे आणि हाती विणलेले वस्त्र  आले आहे.

योगदानांची यादी इथेच संपत नाही.  पितळेची भांडी उत्तर प्रदेशातील, तर पॉलिश केलेले सागवानी लाकूड महाराष्ट्रातून आले आहे.  राममंदिराची कथा केवळ साधने आणि भौगोलिक योगदानाशीच निगडीत नाही.  राम मंदिर निर्मितीची ही प्रक्रिया, या पवित्र कामात आपले शरीर, मन, आत्मा आणि कौशल्य ओतलेल्या असंख्य प्रतिभावान कारागीर आणि हस्तकला कारागीरांची कथा विदीत करते.

राम मंदिर हे  अयोध्येतील केवळ एक वास्तू  नव्हे ; श्रद्धेच्या एकत्रित सामर्थ्याचा तो जिवंत वस्तुपाठ आहे.  प्रत्येक पाषाण , प्रत्येक कोरीव काम, प्रत्येक घंटा, प्रत्येक वस्त्र-कापड,  ‘एक भारत श्रेष्ठ भारतची कथा सांगते.  ही कथा भौगोलिक सीमा ओलांडून  सामूहिक आध्यात्मिक प्रवासात असंख्य मने परस्परांशी जोडते.

***

N.Chitale/A.Save/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1998404) Visitor Counter : 166