युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तामिळनाडूने दोन सुवर्णपदके तर पश्चिम बंगाल आणि दिल्लीने प्रत्येकी एक सुवर्णपदक पटकावले

Posted On: 20 JAN 2024 8:47PM by PIB Mumbai

 

सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी शनिवारी यजमान तामिळनाडूने दोन सुवर्णपदके जिंकत आपले खाते उघडले तर पश्चिम बंगाल आणि दिल्लीने प्रत्येकी एक सुवर्णपदक पटकावले.

देवेश के आणि सर्वेश के या जुळ्या भावांनी राजरथिनम स्टेडियमवर मुलांच्या योगासन रिदमिक पेअर  गटात  पहिले सुवर्णपदक जिंकले तर पश्चिम बंगालच्या मेघा मैती आणि उर्मी समता यांनी मुलींच्या गटात  विजेतेपद पटकावले.

टीएनपीईएसयू टेबल टेनिस हॉल येथे अँब्लेस गोविन एन ने मणिपूरच्या झेनिथ एसएचवर 15-11 असा विजय मिळवून मुलांच्या इपी सुवर्णपदकावर नाव कोरले आणि मुलींच्या सेबर फेन्सिंगमध्ये दिल्लीच्या खनक कौशिकने हरियाणाच्या हिमांशी नेगीचा 15-9 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

ओव्हिया सी आणि शिवानी डी यांनी मुलींच्या रिदमिक पेअर्स स्पर्धेत योगासन एरिनामधून यजमानांसाठी एकूण 128.32 गुणांसह  कांस्यपदक जिंकले  तर फेन्सर जेफरलिन जेएस ने मुलींच्या सेबर मध्ये कांस्यपदक मिळवले.

दक्षिण भारतात प्रथमच आयोजित केल्या जात असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या भव्य उद्घाटन सोहळ्यानंतर  यजमानांना  याहून चांगली सुरुवात मिळाली  नसती.

देवेश आणि सर्वेश यांनी 127.89 गुणांसह रिदमिक पेअर क्रीडा प्रकारात अव्वल स्थान मिळविण्यासाठी उत्कृष्ट समन्वय आणि स्थैर्य दाखवले.  पश्चिम बंगालच्या अवरजित साहा आणि निल सरकार यांनी 127.57 गुणांसह रौप्य पदक तर महाराष्ट्राच्या खुश इंगोले आणि यज्ञेश वानखेडे (127.20 गुण) यांनी कांस्यपदक पटकावले.

पदक तालिका : https://youth.kheloindia.gov.in/medal-tally

PHOTO CAPTION: KIYG 2023 - Gold Medalists Devesh K (L), Savesh K (R) winners of Rhythmic Pair Yogasan State - Tamil Nadu

***

M.Pange/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1998246) Visitor Counter : 83