रेल्वे मंत्रालय
देशातील 597 रेल्वे स्थानके उद्वाहक अथवा सरकते जिने उपलब्ध करून दिव्यांगजनांसाठी करण्यात आली अनुकूल
Posted On:
17 JAN 2024 8:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 17 जानेवारी 2024
भारत सरकारच्या ‘सुगम्य भारत मिशन’ अथवा एक्सेसिबल इंडिया मोहिमेचा भाग म्हणून, रेल्वे स्थानके आणि रेल्वे गाड्या दिव्यांगजनांसाठी अनुकूल बनवण्यासाठी भारतीय रेल्वे वचनबद्ध आहे. रेल्वे स्थानकांवरील दिव्यांगजनांच्या सुविधांसह, सर्व प्रकारच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याची आणि त्या वाढवण्याची प्रक्रिया सातत्त्याने सुरु असते.
वृद्ध आणि आजारी व्यक्ती तसेच दिव्यांगजनांचा वावर सुलभ करण्यासाठी तसेच प्रमुख रेल्वे स्थानकांच्या फलाटांवरील प्रवेश आणि हालचाली सुलभ करण्यासाठी, ‘सुगम्य भारत अभियाना’चा एक भाग म्हणून रेल्वे स्थानकांवर लिफ्ट (उद्वाहक)/एस्केलेटर (सरकते जिने) उपलब्ध केले जात आहेत.
एकूण 597 रेल्वे स्थानकांवर उद्वाहक अथवा सरकते जिने बसवण्यात आले आहेत.
एस्केलेटरबाबत तपशील:
Provided (in Nos.)
|
Remarks
|
Provided till March'2014
|
143
|
Total 1287 escalators at 372 stations provided
|
Provided during 2014-23
|
1144
|
Total
|
1287
|
वर्ष 2023 मध्ये 128 सरकते जिने झाले
लिफ्ट बाबत तपशील :
Provided (in Nos.)
|
Remarks
|
Provided till March'2014
|
97
|
Total 1292 lifts at 497 stations provided
|
Provided during 2014-23
|
1195
|
Total
|
1292
|
वर्ष 2023 मध्ये 227 लिफ्ट पुरवण्यात आल्या.
भारतीय रेल्वे विविध स्थानकांवर प्रवाशांसाठी असलेल्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. रेल्वे फलाटावरील सरकते जिने आणि उद्वाहक यांची तरतूद प्रवाशांची ये-जा सुलभ करेल. प्रवाशांची सुरक्षा वाढवण्याच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल आहे.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1997102)
Visitor Counter : 128