पंचायती राज मंत्रालय
केंद्रीय मंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्या हस्ते उद्या 18 जानेवारी 2024 रोजी आंध्रप्रदेशातील तिरुपती येथे ‘आरोग्यसंपन्न भविष्याच्या दिशेने निरोगी गावे’ या तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे होणार उद्घाटन
या राष्ट्रीय कार्यशाळेत 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 800 हून अधिक व्यक्तींच्या सहभागाची अपेक्षा
प्रविष्टि तिथि:
17 JAN 2024 5:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 17 जानेवारी 2024
पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्या हस्ते 18 जानेवारी 2024 रोजी आंध्रप्रदेशातील तिरुपती येथे आरोग्यसंपन्न भविष्याच्या दिशेने निरोगी गावे या तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन होईल.
पंचायती राज मंत्रालय (एमओपीआर) आंध्रप्रदेश सरकारच्या पंचायत राज आणि ग्रामीण विकास विभागाच्या निकट सहकार्याने 18 ते 20 जानेवारी 2024 दरम्यान संकल्पना 2: निरोगी गाव हा संकल्पनात्मक दृष्टिकोन स्वीकारून ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत विकास लक्ष्यांचे स्थानिकीकरण या विषयावर या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करत आहे.
चांगल्या सवयी; आरोग्याच्या मापदंडांवर देखरेख ठेवण्यासाठी पंचायतींची भूमिका, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांशी लढण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि ग्रामपंचायत विकास आराखडा (जीपीडीपी) मध्ये ग्राम आरोग्य योजनेचे एकात्मीकरण, अनुकरणीय धोरणे, दृष्टिकोन, आणि नाविन्यपूर्ण मॉडेल्सचे प्रदर्शन करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश असेल.
ही कार्यशाळा सहकार्यासाठी, ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी आणि निकोप भविष्याच्या उभारणीकरिता धोरण आखण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ प्रदान करते. शाश्वत विकास लक्ष्यांचे स्थानिकीकरण (एलएसडीजी) चे उद्दिष्ट जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी) चे स्थानिकीकरण करणे आणि तळागाळातील विशिष्ट आव्हाने आणि संधींना सामोरे जाणे हे आहे. एलएसडीजी ची संकल्पना 2 म्हणजेच निरोगी गाव ही आरोग्य आणि कल्याणावर भर देणाऱ्या खेड्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करते.
संकल्पना 2: निरोगी गाव या प्रतिष्ठित राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित झालेल्या पंचायतींनाही तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1996991)
आगंतुक पटल : 128