माहिती आणि प्रसारण मंत्रालय

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारणाच्या तरतुदी, प्रसारमाध्यमांसाठी सुविधा आणि आरोग्यविषयक सज्जता

Posted On: 15 JAN 2024 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 15 जानेवारी 2024

अयोध्या धाम येथे 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे सुरळीत आणि यशस्वी आयोजन करण्यासाठी अतिशय काटेकोर व्यवस्था केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी धार्मिक विधीनुसार प्राणप्रतिष्ठा करतील. या दिवशी या मंदिराला 8000 पेक्षा जास्त पाहुणे भेट देण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर 23 जानेवारीपासून मंदिराला लाखो भाविक भेट देतील.

थेट प्रसारण

या सोहळ्याचे थेट प्रसारण करण्यासाठी पुरेशा व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. या संपूर्ण सोहळ्याचे दूरदर्शनकडून 4के दर्जाचे थेट प्रसारण डीडी न्यूज आणि डीडी नॅशनल वाहिन्यांवरून करण्यात येईल. 23 जानेवारी 2024 रोजी आरती आणि श्री राम मंदिर जनतेला खुले करण्याचे थेट प्रसारण दूरदर्शन करेल.

22-1-24 रोजी अयोध्येमधील सोहळ्याचे क्लीन फीड दूरदर्शन एएनआय टीव्ही आणि पीटीआय व्हिडिओसोबत सामाईक करेल. या एजन्सीचे सभासद असलेल्या सर्व टीव्ही वाहिन्या हे फीड तिथून मिळवू शकतात.

इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारकांसाठी क्लीन फीडच्या की सह एक यूट्युब लिंक तयार करण्यात येईल. संबंधित प्रसारकांसोबत, त्यांच्या विनंतीवरून ही लिंक सामाईक करण्यात येईल. यूट्युब लिंक मिळवण्यासाठी स्थानिक प्रसारक त्यांची विनंती पत्र सूचना कार्यालयाकडे पाठवू शकतात. आंतरराष्ट्रीय टीव्ही वाहिन्यांना थेट प्रसारभारतीकडे त्यांची विनंती पाठवावी लागेल. संपर्काचे तपशील पीआयबी मीडिया ऍडवायजरी मध्ये उपलब्ध आहेत, जे या ठिकाणी पाहता येतील.

क्लीन फीडची आवश्यकता नसल्यास वाहिन्यांना  डीडी न्यूजला जोडून घेण्याचा  पर्याय देखील आहे.अशावेळी दूरदर्शनला सौजन्य द्यावे. पीआयबी म्हणजेच पत्र सूचना कार्यालय  या कार्यक्रमाची छायाचित्रे आणि वृत्त  इंग्रजी, हिंदी आणि भारतीय राज्य भाषांमध्ये जारी करेल.

अयोध्या माध्यम केंद्र

अयोध्येतील रामकथा संग्रहालय येथे मर्यादित क्षमतेचे  माध्यम केंद्र उभारले जात आहे, इथून  प्रसारण  पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी  मोठे एलईडी टीव्ही लावले जात आहेत. प्रसारमाध्यमांना त्यांच्या बातम्या पाठवता  याव्यात यासाठी हे माध्यम केंद्र   वाय-फाय सुविधेसह सुसज्ज असेल.
 
माध्यमांच्या प्रवेशिकांसाठी पोर्टल

अयोध्येतून या कार्यक्रमाचे वृत्तांकन  करू इच्छिणाऱ्या माध्यम संस्था पीआयबीच्या केंद्रीकृत पोर्टलद्वारे, 17 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात; याच्या  आधारावर राज्य प्रशासनाद्वारे सुरक्षा प्रवेशिका जारी केल्या जातील.  पोर्टलवर  इथून  प्रवेश करता येईल.

दूरदर्शनचे विशेष कार्यक्रम

थेट प्रक्षेपणाव्यतिरिक्त, दूरदर्शन 1 ते 15 जानेवारी 2024 दरम्यान राम की पैडी नावाचे विशेष बातमीपत्र  चालवत आहे. संध्याकाळी 5 ते  रात्री 8 दरम्यान  “श्री राम अयोध्या आये हैं” या शीर्षकाच्या  एक विशेष थेट कार्यक्रमाचा समावेश आहे, ज्यामध्ये दररोज अयोध्या आढावा , अतिथी चर्चा, विशेष कथा आणि जनवाणी  यांचा समावेश आहे.

आरोग्य सुविधा

लोकांना पुरेशी वैद्यकीय मदत मिळावी यासाठी अयोध्येतील वैद्यकीय सुविधांची माहिती अयोध्येतील स्थानिक प्रशासन आणि रामजन्मभूमी न्यासाच्या  संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. 12 ते 15 जानेवारी 2024 दरम्यान अयोध्येत सुमारे 200 आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जेपीएनए ट्रॉमा सेंटर, एम्स, नवी दिल्ली येथून एक चमू  पाठवण्यात आला  आहे. प्राणप्रतिष्ठा समारंभ आणि संबंधित कार्यक्रमादरम्यान भारत सरकार अयोध्येत भीष्म आपत्कालीन प्रतिसाद सुविधा स्थापन करण्याची शक्यता आहे.


S.Kakade/S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1996433) Visitor Counter : 97