आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 30 कोटी आयुष्मान कार्ड तयार करण्यात आली

Posted On: 14 JAN 2024 5:20PM by PIB Mumbai

 

आयुष्मान भारत प्रधान मंत्री - जन आरोग्य योजना (एबी पीएम-जेएवाय) ने 12 जानेवारी 2024 रोजी 30 कोटी आयुष्मान कार्डचा  टप्पा पार केला आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) द्वारे राबविण्यात येत असलेल्या या प्रमुख योजनेचे उद्दिष्ट 12 कोटी लाभार्थी कुटुंबांना दुय्यम आणि तिसऱ्या स्तरातील काळजी  घेणाऱ्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपयाचे आरोग्य कवच प्रदान करणे हे आहे.

आयुष्मान कार्ड निर्मिती ही आयुष्मान भारत पीएम-जेएवाय अंतर्गत सर्वात प्राथमिक  प्रक्रिया आहे आणि योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याकडे आयुष्मान कार्ड आहे याची खात्री करण्यासाठी सातत्याने आणि ठोस प्रयत्न केले जात आहेत. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच या योजनेत 30 कोटी आयुष्मान कार्ड तयार केली  आहेत. गेल्या दोन आर्थिक वर्षात 16.7 कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड तयार करण्यात आली  आहेत. 2023-24 मध्ये आतापर्यंत  7.5 कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड तयार करण्यात आली आहेत. याचा अर्थ असा आहे की दर मिनिटाला अंदाजे 181 आयुष्मान कार्ड तयार केली  जातात.

भारत सरकारच्या विविध योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी  15 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान देण्यात येणाऱ्या ऑन-स्पॉट सेवांमध्ये आयुष्मान कार्ड निर्मितीचा समावेश करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे तळागाळात कार्ड निर्मिती जलद होण्यास मदत झाली आहे. या यात्रेदरम्यान 2.43 कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड तयार करण्यात आली  आहेत. याशिवाय  आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने विविध आरोग्य योजनांची संपृक्तता प्राप्त करण्यासाठी सुरू केलेल्या आयुष्मान भव मोहिमेदरम्यान 5.6 कोटीहून अधिक आयुष्मान कार्ड (17 सप्टेंबर 2023 रोजी प्रारंभ ) तयार करण्यात आले आहेत.

आर्थिक वर्षानुसार तयार केलेली एकूण आयुष्मान कार्ड खालीलप्रमाणे आहेत:

समाजाच्या टोकातल्या व्यक्ती पर्यंत पोहोचण्यासाठी, एनएचएने आयुष्मान कार्ड निर्मितीसाठी आयुष्मान ॲप सुरु केले आहे.  ॲपमध्ये सेल्फ-व्हेरिफिकेशनचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. साध्या-सोप्प्या 4 पायऱ्यांमध्ये, ही सुविधा वापरकर्त्यांना ॲड्राईड मोबाइल फोन वापरून आयुष्मान कार्ड तयार करण्यास सक्षम करते. कोणतीही व्यक्ती लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी मदत करू शकते. अशा प्रकारे, आयुष्मान ॲप  जन भागिदारीच्या भावनेला सक्षम करते. 13 सप्टेंबर 2023 ला सुरू झाल्यापासून हे ॲप 52 लाखांहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे, यावरून या  ॲप्लिकेशनचे यश समजते.

4.83 कोटी आयुष्मान कार्डसह उत्तर प्रदेश सर्वाधिक आयुष्मान कार्ड बनवलेल्या राज्यांच्या यादीत अव्वल  क्रमांकावर आहे. मध्य प्रदेश  3.78 कोटी आणि महाराष्ट्र  2.39 कोटी आयुष्मान कार्डसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. इतर 11 राज्यांमध्ये 1 कोटींहून अधिक आयुष्मान कार्डधारक आहेत. सर्वाधिक आयुष्मान कार्ड असलेली शीर्ष दहा राज्ये खालीलप्रमाणे आहेत:

 

State

No. of Ayushman cards created

Uttar Pradesh

4.8 Cr

 Madhya Pradesh

3.8 Cr

 Maharashtra

2.4 Cr

 Gujarat

2.3 Cr

 Chhattisgarh

2.1 Cr

 Assam

1.6 Cr

 Rajasthan

1.6 Cr

 Karnataka

1.5 Cr

 Andhra Pradesh

1.5 Cr

 Jharkhand

1.2 Cr

 

आजपर्यंत, महिलांसाठी सुमारे  14.6 कोटी आयुष्मान कार्ड तयार करण्यात आली आहेत. महिला लाभार्थ्यांना 49% आयुष्मान कार्ड जारी करून आरोग्य सेवांची पोहोच यामध्ये  प्रादेशिक समानता आणि उत्पन्न समानतेसह लैंगिक समानता प्राप्त करण्यासाठी ही योजना प्रयत्नशील आहे. तसेच, या योजनेंतर्गत पुरविल्या जाणाऱ्या एकूण उपचाराचा 48%  लाभ महिलांनी घेतला आहे; अशा प्रकारे, लिंग समानता हा योजनेच्या मूळ रचनेचा भाग आहे.

आज आयुष्मान कार्ड समानता, हक्क आणि सक्षमीकरणाचे प्रतीक बनले आहे. हे गरीब आणि वंचित कुटुंबाला आश्वासन देते की त्यांना रोग आणि उपचारादरम्यान झालेल्या भरपूर खर्चाच्या दुहेरी ओझ्याच्या प्रभावापासून संरक्षण केले जाईल. ही वस्तुस्थिती अधोरेखित करून, सर्व पात्र लाभार्थ्यांकडे आयुष्मान कार्ड असावे याची खात्री करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

आयुष्मान भारत पीएम-जेएवायअंतर्गत  6.2 कोटीहून अधिक  रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर  त्यांच्यावरच्या उपचारासाठी   79,157 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च आला. जर लाभार्थ्याने एबी पीएम-जेएवायच्या कक्षेबाहेर तेच उपचार घेतले असते तर उपचाराचा एकूण खर्च जवळपास दुपटीने वाढला असता, अशा प्रकारे गरीब आणि वंचित कुटुंबांच्या खिशातला 1.25 लाख कोटींहून अधिक रूपयांचा खर्च वाचला आहे.

या योजनेबद्दल अधिक तपशीलवार माहिती  येथे उपलब्ध आहे:  https://dashboard.pmjay.gov.in/pmj/#/

 

 

Scan to download Ayushman App for creating Ayushman Card

 

Scan to watch Ayushman Card creation process

***

N.Chitale/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1996083) Visitor Counter : 136